• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उजनीतून तातडीने पाणी सोडा; शेतकऱ्यांना पूर्ववत आठ तास वीज द्या

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
33
VIEWS
Ad 1
Ad 1

दहिगाव उपसा सिंचन प्रकल्प व भीमा-सीना जोड कालव्यातून पाणी सोडण्याची भाजप युवा नेते दिग्विजय बागल यांची मागणी

करमाळा | प्रतिनिधी

करमाळा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून दहिगाव उपसा सिंचन प्रकल्प आणि भीमा-सीना जोड कालव्यातून तातडीने पाणी सोडावे तसेच उजनीकाठावरील शेतकऱ्यांना पूर्ववत आठ तास वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी भाजप जिल्हा युवा नेते तथा मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी केली आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

दिग्विजय बागल यांनी सांगितले की, जून महिना संपून जुलैचा निम्मा कालावधी उलटल्यानंतरही करमाळा तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी अनेक मध्यम प्रकल्प, तलाव आणि स्थानिक पाणीसाठे कोरडे पडले असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर झालेल्या चांगल्या पावसामुळे उजनी धरणात सुमारे ५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून लाभक्षेत्रातील अनेक धरणेही मोठ्या प्रमाणात भरली आहेत. त्यामुळे उजनी धरणात उपलब्ध असलेल्या पाण्याचा लाभ करमाळा तालुक्यालाही तातडीने मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

यंदा शेतकऱ्यांनी तुटपुंज्या पावसाच्या भरोशावर खरीप पेरण्या केल्या आहेत. मात्र त्यानंतर पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिकांची उगवण समाधानकारक झालेली नाही. पावसाची ओढ कायम राहिल्यास खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने दहिगाव उपसा सिंचन प्रकल्प आणि भीमा-सीना जोड कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याबरोबरच उजनीकाठावरील शेतकऱ्यांसाठी पूर्ववत आठ तास वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी दिग्विजय बागल यांनी केली आहे.

दरम्यान, पावसाअभावी तालुक्यातील विहिरी, कूपनलिका आणि लहान पाणीप्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पाणी व वीजपुरवठ्याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Ad 1
Previous Post

२९ जुलैपूर्वी एसआयआर मॅपिंग करा; मतदानाचा हक्क वाचवा

Next Post

सांगा… कसं जगावं? पाऊस पडेना अन् बियाणं उगवेना

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

सांगा... कसं जगावं? पाऊस पडेना अन् बियाणं उगवेना

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In