• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात स्कॉलरशिप अभ्यासवर्गाचा शुभारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
172
VIEWS
Ad 1
Ad 1

इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन; शिक्षकांचा शालेय वेळेव्यतिरिक्त उपक्रम

उरण | प्रतिनिधी नेहरू पोर्ट प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता चौथी व सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या विशेष अभ्यासवर्गाचा शुभारंभ मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी उत्साहात झाला. स्कॉलरशिप परीक्षेतील उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

या अभ्यासवर्गाचे उद्घाटन साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड, मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक गिरीश पाटील, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक भूषण जाधव व अंकुश जोगळे, बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली बोरचटे तसेच स्कॉलरशिप विषयाचे शिक्षक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी हा अभ्यासवर्ग शाळेच्या नियमित वेळेपूर्वी एक तास घेण्यात येणार असून, शिक्षक स्वखुशीने अतिरिक्त वेळ देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याच धर्तीवर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही इंग्रजी व मराठी माध्यमात विशेष अभ्यासवर्ग सुरू असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी अध्यक्ष नरसू पाटील यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाचे महत्त्व पटवून देत, “स्कॉलरशिप मिळवण्यासाठी ध्येयवेडे व्हा. गुणवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्या,” असे आवाहन केले.

प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड यांनी विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन रायगड जिल्ह्यात सर्वाधिक स्कॉलरशिप मिळवण्याचा मान शाळेला मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले.

मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक गिरीश पाटील यांनी स्कॉलरशिप परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेच्या झेंडावंदनाचा मान दिला जातो, ही परंपरा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक अंकुश जोगळे यांनी यंदा सर्वाधिक स्कॉलरशिप मिळवून साई ट्रस्टचे नाव उंचावण्याचे आवाहन केले.

बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली बोरचटे यांनी विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मिळवून पालक व शाळेचा गौरव करावा, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कॉलरशिप तज्ज्ञ मार्गदर्शिका श्रीमती योगसाधना पाटील यांनी केले. विद्यालयाच्या या उपक्रमाचे पालक व विद्यार्थ्यांकडून स्वागत होत असून, यंदाही स्कॉलरशिप परीक्षेत उल्लेखनीय यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Ad 1
Previous Post

सांगा… कसं जगावं? पाऊस पडेना अन् बियाणं उगवेना

Next Post

विष्णुपुरीतील ‘काम बंद आंदोलनात’ मोठ्या संख्येने सहभागी व्हा; दीपक गजभारे यांचे आवाहन

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
12
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
40
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
विष्णुपुरीतील ‘काम बंद आंदोलनात’ मोठ्या संख्येने सहभागी व्हा; दीपक गजभारे यांचे आवाहन

विष्णुपुरीतील 'काम बंद आंदोलनात' मोठ्या संख्येने सहभागी व्हा; दीपक गजभारे यांचे आवाहन

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In