• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तुंग–सुखवाडी–चोपडेवाडी मार्गाचे तातडीने रुंदीकरण करा; ग्रामस्थांची जोरदार मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

भिलवडी | प्रतिनिधी

कृष्णा नदीवरील तुंग–सुखवाडी पुलामुळे परिसरातील अनेक गावांचा सांगली जिल्ह्याशी संपर्क अधिक सोयीस्कर झाला असला, तरी वाढती वाहतूक लक्षात घेता तुंग–सुखवाडी–चोपडेवाडी मार्गाचे तातडीने रुंदीकरण करून दुहेरी मार्ग विकसित करण्याची मागणी शेतकरी, ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून होत आहे.

RelatedPosts

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

तुंग–सुखवाडी पुलामुळे भिलवडी, संतगाव, सूर्यगाव, अमणापूर, माळवाडी, अंकलखोप, औदुंबर आदी गावांतील नागरिकांचा सांगलीपर्यंतचा प्रवास सुमारे पाच ते सात किलोमीटरने कमी झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सध्याचा अरुंद रस्ता वाहतुकीसाठी अपुरा ठरत आहे.

समोरासमोर मोठी वाहने आल्यास वाहतूक कोंडी निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे हा रस्ता रुंद करून दुहेरी मार्ग तयार केल्यास प्रवास अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रस्ता रुंद झाल्यास शेतकऱ्यांना आपला शेतमाल कमी वेळेत सांगलीच्या बाजारपेठेत पोहोचविणे शक्य होईल. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अन्य अत्यावश्यक सेवांना वेगाने पोहोचता येईल, त्यामुळे नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल.

माजी मंत्री दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात विकास निधी उपलब्ध करून कृष्णा नदीवरील तुंग–सुखवाडी पुलाची उभारणी केली होती. या पुलामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. आता या पुलाशी जोडलेल्या तुंग–सुखवाडी–चोपडेवाडी मार्गाचे रुंदीकरण करून दुहेरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात येत आहे.

Previous Post

कडेगाव पोलिसांची चोरीचा गुन्हा अवघ्या दोन दिवसांत उघड; दोन आरोपी अटकेत, १ लाखांची रोकड जप्त

Next Post

मांजरा नदीवरील पुलाचे काम प्रगतीपथावर; परिसरातील वाहतुकीला मिळणार मोठा दिलासा

Related Posts

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम
Blog

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

August 29, 2026
5
Blog

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 29, 2026
36
देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा
Blog

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

August 29, 2026
264
गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.
Blog

गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.

August 29, 2026
17
Blog

नगर पंचायतच्या अर्धवट कामा मुळे नागरिकात नाराजी………………………..

August 29, 2026
12
मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद
Blog

मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद

August 29, 2026
12
Next Post

मांजरा नदीवरील पुलाचे काम प्रगतीपथावर; परिसरातील वाहतुकीला मिळणार मोठा दिलासा

ताज्या बातम्या

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

August 29, 2026

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 29, 2026
देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

August 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In