• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या मागण्यांसाठी खासदार शिवाजीराव काळगे यांना निवेदन; संसदेत प्रश्न मांडण्याचे आश्वासन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

लातूर | प्रतिनिधी

ईपीएस-95 संघर्ष समितीच्या वतीने १५ जुलै रोजी काँग्रेसचे खासदार शिवाजीराव काळगे यांची लातूर येथील कार्यालयात भेट घेऊन विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार काळगे यांनी आगामी पावसाळी अधिवेशनात ईपीएस-95 पेन्शनधारकांचा प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

बैठकीत ईपीएस-95 संघर्ष समितीचे मराठवाडा सहसचिव सूर्यकांत नादरगे यांनी प्रस्तावना करत पेन्शनधारकांच्या विविध मागण्या सविस्तर मांडल्या. त्यावर खासदार शिवाजीराव काळगे म्हणाले की, हा विषय यापूर्वीही त्यांनी तीन ते चार वेळा संसदेत उपस्थित केला असून केंद्रीय कामगार मंत्र्यांकडेही तो निकाली काढण्याची मागणी केली आहे. आगामी अधिवेशनात हा प्रश्न पुन्हा ठामपणे मांडला जाईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच, ५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे होणाऱ्या आंदोलनालाही उपस्थित राहून संसदेत पेन्शनधारकांचा प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “तुमच्या मागण्या रास्त आहेत. सरकारवर दबाव निर्माण करून कोणत्याही पेन्शनधारकावर आत्मदहनाची वेळ येऊ देणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले.

या कार्यक्रमानंतर उपस्थित पेन्शनधारकांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या बैठकीला १६० हून अधिक पेन्शनधारक उपस्थित होते.

यावेळी मराठवाडा सहसचिव सूर्यकांत नादरगे, लातूर जिल्हाध्यक्ष विलास पाटील, कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे व विजय काळे, जिल्हा सहसचिव भास्कर आदमने पाटील, उदगीरचे पी. के. देशमुख यांच्यासह विविध तालुक्यांचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सूर्यकांत नादरगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच, ५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनात सर्व पेन्शनधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि घरी बसलेल्या पेन्शनधारकांनीही आपल्या हक्कासाठीच्या या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

Ad 1
Previous Post

विष्णुपुरीतील ‘काम बंद आंदोलनात’ मोठ्या संख्येने सहभागी व्हा; दीपक गजभारे यांचे आवाहन

Next Post

शिक्षकांचे स्थान वर्गात असावे, BLO च्या कामात नव्हे – रेवणनाथ गायकवाड

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
12
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
40
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

शिक्षकांचे स्थान वर्गात असावे, BLO च्या कामात नव्हे – रेवणनाथ गायकवाड

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In