• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in क्राईम
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

नेर | प्रतिनिधी

RelatedPosts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील कुलूर येथे कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१५ जुलै) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे.

मृताचे नाव शंकर मसाराम मस्के (वय 35, रा. कुंभारी, ता. पुसद) असे आहे. तो पत्नीसह नेर येथील अशोकनगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री शंकर दारूच्या नशेत घरी आला आणि पत्नीशी वाद घातला. त्यानंतर पत्नी माहेरी कुलूर येथे निघून गेली. बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास शंकर पत्नीला घेण्यासाठी कुलूर येथे गेला. यावेळी रामनाथ बाबा मंदिराजवळ त्याचा सासरा रामनाथ किशन कवडे (वय 60, रा. कुलूर) यांच्याशी वाद झाला.

वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात रामनाथ कवडे यांनी कुऱ्हाडीने शंकरच्या मानेवर व शरीरावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या शंकरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी शंकरने रामनाथ कवडे यांच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असला तरी शंकर दारूच्या नशेत पत्नीला वारंवार त्रास देत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यातूनच ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणी अर्चना गजानन कवडे (रा. कुलूर) यांच्या फिर्यादीवरून नेर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास नेर पोलीस करीत आहेत.

Ad 1
Tags: Atul Kamble
Previous Post

रामदारा शिवालय मंदिराचे नूतनीकरण लांबल्याने १ सप्टेंबरपर्यंत दर्शन बंद

Next Post

शिरूरच्या महिला सक्षमीकरणासाठी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांचा मंत्रालयात पाठपुरावा; अंगणवाडी व ‘सखी वन स्टॉप सेंटर’साठी महत्त्वपूर्ण मागण्या

Related Posts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
115
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
94
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
20
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
12
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
110
क्राईम

भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्लाप्रकरणी नऊ आरोपी जेरबंद; एक सराईत गुन्हेगार, एकाचा शोध सुरू

July 15, 2026
16
Next Post

शिरूरच्या महिला सक्षमीकरणासाठी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांचा मंत्रालयात पाठपुरावा; अंगणवाडी व 'सखी वन स्टॉप सेंटर'साठी महत्त्वपूर्ण मागण्या

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In