• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ब्रह्मपुरी तालुक्यातील मूलभूत सुविधा १०० टक्के परिपूर्ण करा; पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | ब्रम्हपुरी | प्रतिनिधी

ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आणि अखंडित मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करत तालुक्यातील मूलभूत सुविधा १०० टक्के पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

नियोजन भवन येथे ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध समस्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत तालुक्यातील वीजपुरवठा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य विभागातील लस व औषधांचा साठा, सार्वजनिक परिवहन व्यवस्था तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध मूलभूत सुविधांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला.

पालकमंत्री डॉ. उईके यांनी प्रत्येक विभागाने लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून अधिक प्रभावीपणे सेवा उपलब्ध करून द्याव्यात, प्रलंबित कामांना गती द्यावी आणि नागरिकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश दिले.

सन २०२६ च्या कर्जमाफी योजनेपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिक परिवहन व्यवस्था सक्षम ठेवण्याबरोबरच आवश्यकतेनुसार शालेय वेळेनुसार बससेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला करण्यात आल्या. विशेष गहन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी शासनाने शाळांच्या वेळेत आवश्यक बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाने दर्जेदार आरोग्य सेवा देत आदर्श निर्माण केला असल्याचे नमूद करत, त्याच धर्तीवर तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. आवश्यकतेनुसार जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अथवा जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनीही विविध विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत सूचना मांडत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून सेवा वितरण अधिक सक्षम करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

Ad 1
Previous Post

कॅन्सरग्रस्त रुग्णाला आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात

Next Post

आठ तास वीज निर्मितीच्या मागणीसाठी उर्जनग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
34
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
17
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
66
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
4
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
6
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
5
Next Post

आठ तास वीज निर्मितीच्या मागणीसाठी उर्जनग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In