• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संत साहित्य आदर्श जीवनाचा वस्तुपाठ – माधव जोशी; भिलवडी शिक्षण संकुलात डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांचा स्मृतीदिन उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | भिलवडी | वार्ताहर

मानवी जीवन भक्ती आणि प्रेमाशिवाय व्यर्थ आहे. शिक्षणामुळे साक्षर झालेल्या व्यक्तीला खरे शहाणपण प्राप्त होण्यासाठी ग्रंथांशी मैत्री करणे आवश्यक आहे. संतांनी निर्माण केलेली साहित्य संपदा ही आदर्श मानवी जीवनाचा वस्तुपाठ असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक माधव जोशी यांनी केले.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व थोर समाजसेविका कै. डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘ग्रंथांच्या सांगाती’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच समाधीस्थळाचे दर्शन घेण्यात आले.

यावेळी माधव जोशी म्हणाले की, डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्यांनी निर्माण केलेल्या आदर्श मार्गावर चालत सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

भिलवडी शिक्षण संस्थेला आपल्या जन्मदिनाचे औचित्य साधून एक लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल डॉ. रविंद्र वाळवेकर यांचा संस्थेच्या वतीने अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सहसचिव के. डी. पाटील यांनी करून दिला. अश्विनी बंडगर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. महेश पाटील यांनी आभार मानले.

यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त अशोक चौगुले, डॉ. सुहास जोशी, संचालक महावीर वठारे, डॉ. रविंद्र वाळवेकर, संभाजी सूर्यवंशी, अजय चौगुले, मुकुंद जोग, प्रा. धनंजय पाटील, सदाशिव तावदर, जे. बी. चौगुले, भू. ना. मगदूम, सुनीता चितळे, अनघा चितळे, अशोक साठे, रोहित नलवडे, मुख्याध्यापक संजय मोरे, प्राचार्य सुरेश शिंदे, सुकुमार किणीकर, विद्या टोणपे, स्मिता माने, सुचेता कुलकर्णी, शंकर बल्लाळ यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Nandkishor Kamble
Previous Post

गुंडवळ ग्रामपंचायत निधी गैरव्यवहारप्रकरणी आमरण उपोषणाचा चौथा दिवस; प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Next Post

FMGE परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणाऱ्या डॉ. अमेय ओल्लालवार यांचा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते सत्कार

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
34
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
20
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
69
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
4
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
6
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
5
Next Post

FMGE परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणाऱ्या डॉ. अमेय ओल्लालवार यांचा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते सत्कार

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In