• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंबेगावच्या पूर्व व उत्तर भागातील रात्रीच्या भारनियमनाविरोधात नागरिकांचा संताप; दिवसा वीज कपातीची मागणी, आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

लोणी | प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील पूर्व व उत्तर भागातील पारगाव, काठापूर, लोणी, जारकरवाडी, निरगुडसर आदी गावांमध्ये सायंकाळी सुरू असलेल्या रात्रीच्या भारनियमनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत होणारे भारनियमन तातडीने बंद करून, वीज कपात करावयाची असल्यास ती दिवसा करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

RelatedPosts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

पारगावचे माजी उपसरपंच सचिन दत्तात्रय अस्वारे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बजरंग देवडे, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी देवडे तसेच परिसरातील नागरिकांनी ही मागणी करत महावितरणने दुर्लक्ष केल्यास संबंधित कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या भारनियमनाचा सर्वाधिक फटका शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि व्यावसायिकांना बसत आहे. सायंकाळच्या वेळेत दूध काढणे, जनावरांसाठी कुट्टी मशीनद्वारे चारा तयार करणे, शेतीची कामे आणि घरगुती कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. याच काळात वीजपुरवठा खंडित होत असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची महत्त्वाची वेळ सायंकाळची असल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही परिणाम होत असल्याचे पालकांनी नमूद केले आहे. तसेच परिसरात बिबट्यासह अन्य वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने अंधारात नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न गंभीर बनत असल्याचे सांगण्यात आले.

“महावितरणने ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन रात्रीऐवजी दिवसा भारनियमन करावे. अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असे माजी उपसरपंच सचिन दत्तात्रय अस्वारे यांनी सांगितले.

दरम्यान, या मागणीवर महावितरण प्रशासन काय निर्णय घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

ओव्हर नाईट ट्रॅव्हल्समध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार; कर्मचाऱ्यावर अपहाराचा आरोप, गुन्हा दाखल

Next Post

संस्कार इनोव्हेटिव्ह अकॅडमीत शालेय मंत्रिमंडळाचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश
Blog

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
45
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)
Blog

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
25
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.
Blog

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026
8
Blog

दोन रेडे, दोन मासे : संत ज्ञानेश्वरांचा अभेदभावनेचा संदेश

September 1, 2026
7
बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर
Blog

बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर

September 1, 2026
15
हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥
Blog

हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥

September 1, 2026
80
Next Post

संस्कार इनोव्हेटिव्ह अकॅडमीत शालेय मंत्रिमंडळाचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In