• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

द्रोणागिरीतील मूलभूत सुविधांवर नागरिकांचा संताप; सिडकोला आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1
Ad 1

उरण | प्रतिनिधी :

उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमध्ये पिण्याचे पाणी, रस्ते, गटारे आणि आरोग्य सुविधांच्या समस्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या समस्यांवर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन, धरणे आणि उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी सिडकोच्या मुख्य अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

RelatedPosts

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, द्रोणागिरी नोडचा विकास करताना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अनेक वर्षांनंतरही मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याने रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा एक दिवसाआड होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. काही भागांत मुबलक पाणीपुरवठा होत असताना इतर भागांतील नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

याशिवाय, परिसरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मोठमोठे खड्डे, उखडलेले रस्ते आणि पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. याचा परिणाम नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गटारे आणि नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. उघड्या गटारांमुळे डासांची संख्या वाढून डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याचीही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

निवेदनात भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत नागरिकांना सन्मानाने आणि सुरक्षित वातावरणात जगण्याचा अधिकार असल्याचे नमूद करत, आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

नागरिकांनी नियमित व सुरळीत पाणीपुरवठा, सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, गटारे व नाल्यांची स्वच्छता, बंद गटार व्यवस्था आणि आरोग्यविषयक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याची मागणी केली आहे.

समस्या तातडीने सोडविण्यात आल्या नाहीत, तर लोकशाही मार्गाने आंदोलन, धरणे आणि उपोषण छेडण्यात येईल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सिडको प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे.

Ad 1
Previous Post

मारेगावात तरुणाच्या मृत्यूनंतर विषारी दारूची चर्चा; नागरिकांकडून सखोल चौकशीची मागणी

Next Post

नीट-टेट पेपरफुटीविरोधात उरणमध्ये २० जुलै रोजी एल्गार; DYFI-SFI चे आंदोलन

Related Posts

Blog

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
6
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम
Blog

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
8
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी
Blog

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026
21
🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆
Blog

🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆

October 18, 2026
2
मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात
Blog

मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात

October 18, 2026
2
हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी
Blog

हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी

October 18, 2026
3
Next Post

नीट-टेट पेपरफुटीविरोधात उरणमध्ये २० जुलै रोजी एल्गार; DYFI-SFI चे आंदोलन

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In