
कर्जत | प्रतिनिधी
मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वेने 20 जुलैपासून 12 डब्यांच्या 10 उपनगरी लोकल गाड्यांचे 15 डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवासी क्षमता वाढणार असून गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, डब्यांची संख्या वाढल्याने प्रवाशांना अधिक जागा आणि तुलनेने आरामदायी प्रवासाची सुविधा मिळेल. विशेषतः गर्दीच्या वेळेत होणारी गैरसोय कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
15 डब्यांच्या लोकल सेवा (एकूण 10)
डाउन मार्ग (CSMT ते उपनगर)
- सकाळी 9:15 – CSMT ते अंबरनाथ
- दुपारी 12:26 – CSMT ते कल्याण
- दुपारी 3:03 – CSMT ते बदलापूर
- सायंकाळी 6:21 – CSMT ते कर्जत
- रात्री 11:08 – CSMT ते अंबरनाथ
अप मार्ग (उपनगर ते CSMT)
- सकाळी 7:51 – अंबरनाथ ते CSMT
- सकाळी 11:03 – अंबरनाथ ते CSMT
- दुपारी 1:36 – कल्याण ते CSMT
- सायंकाळी 4:47 – बदलापूर ते CSMT
- रात्री 8:38 – कर्जत ते CSMT
या बदलामुळे मध्य रेल्वेवरील लाखो दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.




