• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मालेगावमध्ये ‘रावे’ विद्यार्थ्यांचे ‘पीआरए’ तंत्राद्वारे प्रभावी सादरीकरण; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
मालेगावमध्ये ‘रावे’ विद्यार्थ्यांचे ‘पीआरए’ तंत्राद्वारे प्रभावी सादरीकरण; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

उदगीर | प्रतिनिधी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय, चिंचोली (लातूर) येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत मालेगाव येथे सहभागी ग्रामीण मूल्यांकन (PRA – Participatory Rural Appraisal) या उपक्रमाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात शेतकरी, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण सूचना आणि अनुभव मांडले.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर धुमणे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एम. आर. मुळे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रा. एम. आर. मुळे यांनी सांगितले की, पीआरए तंत्रज्ञानामुळे कृषी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील प्रत्यक्ष परिस्थिती, समस्या आणि गरजा समजून घेण्याची संधी मिळते. या अभ्यासातून ग्रामीण व कृषी विकासासाठी अधिक प्रभावी आणि व्यावहारिक नियोजन करता येते.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पीआरएच्या विविध शास्त्रीय पद्धतींचा वापर करून मालेगावचा सामाजिक नकाशा, संसाधन नकाशा, कृषी व्यवस्था, नैसर्गिक संसाधनांची सद्यस्थिती तसेच विकासाच्या संधींचे सविस्तर सादरीकरण केले. लोकसहभागाशिवाय ग्रामीण विकास शक्य नसल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून दिला.

या उपक्रमात कृषीदूत वैभव जाधव (प्रास्ताविक), ऋतिक राठोड, गोविंद धुमणे, शिवम कदम, हृतिक अवचेल आणि गणेश वांढे यांनी सक्रिय सहभाग घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

हा कार्यक्रम रावे समन्वयक प्रा. बी. डी. कदम, कार्यक्रम अधिकारी डॉ. राकेश कुमार माशेट्टी आणि हृतिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.

समारोप प्रसंगी उपस्थित शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण सादरीकरणाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव मिळण्याबरोबरच ग्रामीण भागात कृषीविषयक जनजागृती आणि विकासाला चालना मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Previous Post

अजितदादा पवार पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ६ लाखांची चोरी; डीव्हीआरही लंपास

Next Post

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ‘कै. रामराव दादा बोराडे विचारमंच’चा स्तुत्य उपक्रम; वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराचे वाटप

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
84
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
18
Next Post
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ‘कै. रामराव दादा बोराडे विचारमंच’चा स्तुत्य उपक्रम; वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराचे वाटप

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 'कै. रामराव दादा बोराडे विचारमंच'चा स्तुत्य उपक्रम; वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराचे वाटप

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In