• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बेजबाबदार शिक्षणव्यवस्थेविरोधात क्रांती चौकात विद्यार्थ्यांचा जनआक्रोश; दिल्लीतील आंदोलनाला संभाजीनगरातून समर्थन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
बेजबाबदार शिक्षणव्यवस्थेविरोधात क्रांती चौकात विद्यार्थ्यांचा जनआक्रोश; दिल्लीतील आंदोलनाला संभाजीनगरातून समर्थन
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

देशातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि शैक्षणिक धोरणांबाबत नाराजी व्यक्त करत छत्रपती संभाजीनगरातील विद्यार्थ्यांनी रविवारी क्रांती चौक येथे जनआक्रोश आंदोलन केले. यावेळी विविध विद्यार्थी, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी होत शिक्षण क्षेत्रातील समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला नैतिक समर्थन देण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, देशभरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, प्रवेश प्रक्रियेतील अडचणी, निकालातील विलंब आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी “शिक्षण हक्क आहे, उपकार नाही”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “बेजबाबदार शिक्षणव्यवस्था बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण, वाढती शैक्षणिक असमानता, स्पर्धा परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्नांवरही चिंता व्यक्त केली.

आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.

क्रांती चौकातील या आंदोलनात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर व्यापक पातळीवर चर्चा होऊन शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा व्हाव्यात, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Previous Post

व्यसनमुक्तीच्या वाटेवरून समाजसेवेचा वसा; वारकऱ्यांसाठी १ हजार गुळ-शेंगदाणा लाडूंची प्रेमभेट

Next Post

वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महापालिकाच चालवणार; महासभेत निर्णय, १०८ पदभरतीसाठी आमदारांना महापौरांचे आवाहन

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
84
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
18
Next Post

वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महापालिकाच चालवणार; महासभेत निर्णय, १०८ पदभरतीसाठी आमदारांना महापौरांचे आवाहन

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In