• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी

मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) अभियानात पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत, याची विशेष दक्षता घ्यावी. तसेच बोगस मतदारांची नावे असल्यास ती शासकीय बीएलओंच्या निदर्शनास आणून वगळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी, तेंडोली, ओरोस, वेताळबांबर्डे आणि पावशी या जिल्हा परिषद विभागांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत संघटनात्मक आढावा घेत मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी वैभव नाईक यांनी बूथ लेव्हल एजंट (BLA) यांनी आपल्या बूथवरील प्रत्येक मतदाराची नोंदणी झाली आहे का, याची खात्री करावी तसेच शासकीय बीएलओंसोबत समन्वय साधून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे, असे सांगितले. पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत आणि बोगस नावे मतदार यादीत राहणार नाहीत, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीत बोलताना वैभव नाईक यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर टीका केली. वाढती महागाई, स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटी, वीजपुरवठ्याचे प्रश्न, स्मार्ट वीजमीटर, अणुऊर्जा आणि मायनिंग प्रकल्प, तसेच विविध योजनांतील लाभार्थ्यांच्या अडचणींसह कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांनी आपल्या आणि पुढील पिढीच्या भविष्यासाठी या प्रश्नांवर आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, उपनेत्या जान्हवी सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांच्यासह पिंगुळी, तेंडोली, ओरोस, वेताळबांबर्डे आणि पावशी विभागातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शाखाप्रमुख, बूथप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महापालिकाच चालवणार; महासभेत निर्णय, १०८ पदभरतीसाठी आमदारांना महापौरांचे आवाहन

Next Post

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
84
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
18
Next Post
कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In