कणकवली | प्रतिनिधी
इस्कॉन कणकवली (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) यांच्या वतीने कणकवली येथील इस्कॉन मंदिरात आयोजित करण्यात आलेला श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव रविवारी भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्ष संदेश पारकर आणि उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
या महोत्सवात कणकवलीसह परिसरातील शेकडो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान श्री जगन्नाथांचे दर्शन घेतले आणि रथयात्रेत सहभागी होत भक्तिरसाचा आनंद लुटला. संपूर्ण परिसर हरिनाम संकीर्तन आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इस्कॉन कणकवलीच्या स्वयंसेवकांनी आणि भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी साई प्रभुजी, प्रथमेश प्रभुजी, मनीषा कवठकर माताजी, संजय टकले प्रभुजी, अमलप्रिया माताजी, सागर आजगांवकर प्रभुजी, दाऊजी बलराम प्रभुजी, मनीषा धामापूरकर माताजी, योगिता रासम माताजी, रेखा राठोड माताजी, बोंडे माताजी, तायडे माताजी, श्रेया कसवणकर माताजी, सरुडकर माताजी आणि दिगंबर आढाव प्रभुजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव भक्तिभावपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.

