• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाथरी तालुक्यातील वीज लोडशेडिंग बंद करण्याची मागणी; शिवसेना (उबाठा)चा आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

पाथरी | प्रतिनिधी :

पाथरी तालुक्यात सुरू असलेले अन्यायकारक वीज लोडशेडिंग १ ऑगस्ट २०२६ पूर्वी बंद करून नियमित व सुनियोजित वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, परभणी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

शिवसेना (उबाठा)चे जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे आणि पाथरी तालुकाप्रमुख हरिभाऊ वाकणकर यांनी २० जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

निवेदनानुसार, वाघाळा, बाभळगाव, रेणापूर, विटा, हदगाव तसेच पाथरी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये, वाड्या-वस्त्यांमध्ये आणि शेती परिसरात दररोज अवेळी वीज लोडशेडिंग होत आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळीच त्रिफेज वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकरी आणि नागरिक दोघांनाही त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी वीज खंडित होत असल्यामुळे साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा धोका वाढत असून, अनेक ठिकाणी रॉकेलही उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यामुळे तालुक्यातील लोडशेडिंग तातडीने बंद करून नियमित व नियोजनबद्ध वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा शिवसेना (उबाठा)च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे, तालुकाप्रमुख हरिभाऊ वाकणकर तसेच लोणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच गवारे यांनी दिला आहे.

या निवेदनानंतर प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: Tukaram Ugle
Previous Post

वहिवाटीचा रस्ता बंद केल्याच्या निषेधार्थ तडवळे येथे सामूहिक धरणे आंदोलन

Next Post

कवठे महांकाळ तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अविराजे शिंदे ‘सरकार’ यांची निवड

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
83
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
17
Next Post

कवठे महांकाळ तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अविराजे शिंदे ‘सरकार’ यांची निवड

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In