
रिळे | प्रतिनिधी
रिळे ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक जागा श्रीमती छाया लक्ष्मण पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी स्वेच्छेने दान दिल्याने गावातील महत्त्वाच्या पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या या समाजोपयोगी व दातृत्वपूर्ण योगदानाबद्दल ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
गावाच्या विकासासाठी पाणी ही मूलभूत गरज असून, या योजनेसाठी जागा उपलब्ध झाल्याने भविष्यात गावातील पाणीपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. पाटील कुटुंबाने दाखविलेली सामाजिक बांधिलकी गावासाठी प्रेरणादायी असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.
यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, गावातील विकासकामे, सार्वजनिक सुविधा आणि लोकहिताचे उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी भेदभाव बाजूला ठेवून एकत्रितपणे सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या सहभागातूनच गावाचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
पाटील कुटुंबाच्या या उदात्त कार्यामुळे रिळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या या योगदानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

