• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वारकरी चालतोय विठ्ठलाच्या भेटीला… डॉक्टर धावतोय वारकऱ्यांच्या सेवेला…

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
0
SHARES
49
VIEWS
Ad 1

पैठण ते पंढरपूर पालखी मार्गावर डॉ. अभिजित सपकाळ यांची १७ वर्षांची अखंड आरोग्यवारी; हजारो वारकऱ्यांना उपचारांचा आधार

भोकरदन | प्रतिनिधी

टाळ-मृदुंगाचा गजर, मुखी विठ्ठलाचे नाम आणि पंढरीच्या दिशेने निघालेला लाखो वारकऱ्यांचा जनसागर… या भक्तीमय वातावरणात वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गेल्या तब्बल १७ वर्षांपासून डॉ. अभिजित सपकाळ आणि त्यांचे वैद्यकीय पथक निःस्वार्थपणे सेवा बजावत आहे. “वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या भावनेतून त्यांनी पैठण ते पंढरपूर पालखी मार्गावर अखंड आरोग्यसेवेची परंपरा जपली आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

आषाढी वारीदरम्यान लाखो वारकरी ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता पायी प्रवास करतात. या प्रवासात उद्भवणाऱ्या विविध आरोग्य समस्यांवर तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी रेड स्वस्तिक सोसायटीच्या सहकार्याने डॉ. अभिजित सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली यंदाही १९ दिवस मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

वैद्यकीय पथकाकडून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, प्रथमोपचार, औषधोपचार, वैद्यकीय सल्ला तसेच गरजेनुसार आपत्कालीन उपचारांची सुविधा दिली जात आहे.

१० लाख रुपयांच्या औषधांचे मोफत वितरण

यंदाच्या सेवाकार्यात सुमारे १० लाख रुपये किमतीच्या औषधांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. पालखी मार्गावरील विविध ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात असून ताप, सर्दी, अंगदुखी, थकवा, पायांचे विकार आदी समस्यांवर तातडीने उपचार केले जात आहेत.

१७ वर्षांची अखंड सेवा

डॉ. अभिजित सपकाळ यांनी गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने ही सेवा सुरू ठेवली आहे. हजारो वारकऱ्यांना वेळेवर उपचार मिळवून देत त्यांच्या भक्तीच्या प्रवासाला आरोग्याची साथ देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. डॉक्टरकी हा केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम असल्याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.

या सेवाकार्यात डॉ. विवेक अधिकार, गणेश कुलकर्णी, डॉ. मंगेश सपकाळ, विजय पवार यांच्यासह डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांची टीम सहभागी झाली आहे.

“प्रत्येक वारकरी सुखरूप पंढरीत पोहोचावा”

याबाबत बोलताना डॉ. अभिजित सपकाळ म्हणाले, “वारकऱ्यांची सेवा हीच आमच्यासाठी विठ्ठलाची सेवा आहे. गेली १७ वर्षे आम्ही निःस्वार्थ भावनेने ही आरोग्यसेवा देत आहोत. प्रत्येक वारकरी सुखरूप पंढरीत पोहोचावा, हाच आमचा प्रयत्न असून समाजाच्या सहकार्याने ही सेवा भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा आमचा निर्धार आहे.”

भक्ती आणि सेवाभावाचा सुंदर संगम घडवणाऱ्या या उपक्रमामुळे पालखी मार्गावरील हजारो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून, डॉ. अभिजित सपकाळ आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाच्या सेवाभावाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Previous Post

‘महसूल तुमच्या दारी’ : भोकरदन-जाफ्राबादसाठी २२ जुलै रोजी भव्य समाधान शिबिर

Next Post

शिव स्वराज्य फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न; ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा शुभारंभ

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
56
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
79
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

शिव स्वराज्य फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न; ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा शुभारंभ

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In