• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार व पेपरफुटीविरोधात शहाद्यात विविध संघटनांचे लाक्षणिक उपोषण; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | शहादा | प्रतिनिधी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील अनागोंदीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांच्या वतीने शहादा येथे सोमवारी (दि. 20) लाक्षणिक उपोषण व निदर्शने करण्यात आली.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

शहादा शहरातील प्रांताधिकारी कार्यालय परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलनास सुरुवात झाली. आंदोलकांनी शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार, वारंवार होणाऱ्या पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या अभावाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण मानसिक तणावाखाली आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून टोकाची पावले उचलल्याच्या घटनांकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच वाढती बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक विषमता यांसारख्या प्रश्नांवरही सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या:

  • दिल्लीतील आंदोलनकर्त्यांशी केंद्र सरकारने तातडीने चर्चा करावी.
  • शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.
  • राष्ट्रीय व राज्यस्तरीय परीक्षा आणि भरती प्रक्रियेची स्वतंत्र न्यायिक चौकशी करावी.
  • पेपरफुटी व भरती गैरव्यवहारातील दोषींवर कठोर कारवाई करावी.
  • बंद पडलेल्या शासकीय शाळा पुन्हा सुरू करून शिक्षण क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणूक वाढवावी.
  • परीक्षा व्यवस्थेसाठी पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे.
  • शिक्षणातील खासगीकरण व व्यापारीकरणावर प्रभावी नियंत्रण आणावे.
  • संविधानिक मूल्ये, समान संधी आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांनुसार शिक्षण व रोजगार धोरणांची पुनर्रचना करावी.

“शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून तो भ्रष्टाचाराचा विषय होऊ शकत नाही. तरुणांचे भविष्य सुरक्षित करणे ही शासनाची जबाबदारी आहे,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

या आंदोलनात वाहरू सोनवणे, नामदेव पटले, अनिल कुवर, कॉ. ईश्वर पाटील, सुरेश मोरे, निलेश पाटील, डॉ. तुषार सन्नानसे, चंद्रसिंग बरडे, गोसा पेंटर, वनसिंग ठाकरे, जमन ठाकरे, हरीष बोरसे, योगेश मोगरे, अजय ठाकरे, रंजना कान्हेरे, ज्योती नाईक, भामिनी पिंपळे, प्रा. नेत्रदीपक कुवर, हिरालाल रोकडे, योगेश सावंत, रूपेश जाधव, वनिता पटले, ताराताई मराठे, राजेंद्र गावित, प्रा. मनोज गायकवाड, ॲड. महिरे, ॲड. खर्डे, पी. एस. पेंढारकर, दिलवर पाडवी, राजेश ठाकरे, तात्याजी पवार, धनराज पानपाटील, संजू पानपाटील, सचिन पानपाटील, इंजि. रविंद्र आगळे, विनायक सावळे, हृदयेश चव्हाण, रमेश बिरारे, दिलीप बिरारे, प्रदीप केदारे, भुजबळ गुरुजी, जितेंद्र बिरारे, विश्वास जगदेव, संजना सोलंकी, मंदाकिनी रामराजे, दादाभाई पिंपळे, सुनील शिरसाठ, चुनिलाल ब्राम्हणे, गणेश वळवी यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

‘वाढदिवस नव्हे, समाजसेवेचा महोत्सव’! चंद्रकांत शिंदे यांच्या सामाजिक उपक्रमांची तालुकाभर चर्चा

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना १ लाखांचा अपघाती विमा

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
56
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
79
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना १ लाखांचा अपघाती विमा

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In