• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘वाढदिवस नव्हे, समाजसेवेचा महोत्सव’! चंद्रकांत शिंदे यांच्या सामाजिक उपक्रमांची तालुकाभर चर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

जत | प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, शिवसेना जत उपतालुका प्रमुख तथा युवा सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिवाजी शिंदे यांचा वाढदिवस दि. 18 जुलै रोजी विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. रक्तदान, मोफत नेत्रतपासणी, शालेय साहित्य वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड नोंदणी अशा उपक्रमांमुळे त्यांच्या कार्याची जत तालुक्यात व्यापक चर्चा होत आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ओम साई प्रतिष्ठान, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

याच कार्यक्रमात मोफत नेत्रतपासणी व सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा 75 नागरिकांनी लाभ घेतला. तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC बस सवलत कार्ड नोंदणी व वितरणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

कार्यक्रमास शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते, जत तालुका अध्यक्ष अंकुश हुवाळे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. शिवाजी खिलारे, माजी सरपंच धोंडीराम माने, बबन बुरुटे, महादेव साळुंखे, शिवसेना वैद्यकीय आघाडीचे तालुका प्रमुख दिपक बुरुटे, युवासेना तालुका प्रमुख विवेक चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. शिवाजी खिलारे यांनी रक्तदानासारख्या उपक्रमातून समाजसेवेचा संदेश दिल्याबद्दल चंद्रकांत शिंदे यांचे कौतुक केले. जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते यांनी त्यांच्या संघटन कौशल्याचा गौरव करत, शिवसेनेची ताकद गावागावात पोहोचविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले. तालुका अध्यक्ष अंकुश हुवाळे यांनीही त्यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे आयोजन ओम साई प्रतिष्ठान, शेगावचे संस्थापक समाधान माने, अध्यक्ष मारुती (बबलू) शिंदे व सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल चंद्रकांत शिंदे यांनी सर्व आयोजक, रक्तदाते, मान्यवर आणि नागरिकांचे आभार मानले.

समाजोपयोगी उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करून “वाढदिवस म्हणजे समाजासाठी काहीतरी देण्याची संधी” हा संदेश चंद्रकांत शिंदे यांनी कृतीतून दिला असून, त्यांच्या या उपक्रमाचे जत तालुक्यासह परिसरात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Tags: Arun Koli
Previous Post

कडक उन्हामुळे खरीप पिके कोमेजली; अंबड तालुक्यात शेतकरी चिंतेत

Next Post

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार व पेपरफुटीविरोधात शहाद्यात विविध संघटनांचे लाक्षणिक उपोषण; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
55
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
79
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार व पेपरफुटीविरोधात शहाद्यात विविध संघटनांचे लाक्षणिक उपोषण; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In