• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
0
SHARES
51
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | मारेगाव | प्रतिनिधी

मारेगाव तालुक्यातील चिंचोली (बोटोनी सर्कल) अंतर्गत ग्राम जळका येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची बाब समोर आल्यानंतर वणी विधानसभा मतदारसंघातील मनसे नेते राजूभाऊ उंबरकर यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत मारेगाव पंचायत समितीत धाव घेतली.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

ग्राम जळका येथील जिल्हा परिषद शाळेत सुमारे ६० ते ६५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, शाळेत केवळ एक शिक्षक आणि मुख्याध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार पालकांनी राजूभाऊ उंबरकर यांच्याकडे केली होती.

यानंतर राजूभाऊ उंबरकर यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भीमराव वाहनखंडे यांना निवेदन देऊन शाळेत तातडीने अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी आवश्यक शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत गरज भासल्यास स्वखर्चातून शिक्षकांचे वेतन देण्याचीही तयारी राजूभाऊ उंबरकर यांनी दर्शविल्याची माहिती समोर आली.

या वेळी मनसेचे संतोषभाऊ रोगे, चांद बहादे, खामणकर, अनंतभाऊ, सचिनभाऊ यांच्यासह अन्य कार्यकर्ते तसेच ग्राम जळका येथील विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

गटविकास अधिकारी भीमराव वाहनखंडे यांनी या मागणीची दखल घेत शाळेसाठी शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्राम जळका येथील पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: Pranay Khaire
Previous Post

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

Next Post

मंत्रिमंडळाचे ५ महत्त्वाचे निर्णय; १७७ तालुक्यांसाठी ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’सह विविध प्रस्तावांना मंजुरी

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
56
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
79
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

मंत्रिमंडळाचे ५ महत्त्वाचे निर्णय; १७७ तालुक्यांसाठी ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’सह विविध प्रस्तावांना मंजुरी

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In