• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मंत्रिमंडळाचे ५ महत्त्वाचे निर्णय; १७७ तालुक्यांसाठी ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’सह विविध प्रस्तावांना मंजुरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | मुंबई | प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित पाच महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

१) राज्यातील १७७ तालुक्यांमध्ये ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’

नियोजन विभागांतर्गत राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये सन २०२६-२७ या वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’ राबविण्यास मंजुरी देण्यात आली. प्रत्येक तालुक्याला ५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना २ ते २१ कोटी रुपयांपर्यंत प्रोत्साहन निधी पुरस्कार स्वरूपात देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.

२) काटोल येथे शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय

कृषी विभागाच्या प्रस्तावानुसार नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. महाविद्यालयात दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. यासाठी ५१ नियमित पदे मंजूर करण्यात आली असून आवश्यक खर्चासाठी १२२.३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

३) एनडीआरएफला पुण्यात विनामूल्य जमीन

महसूल विभागाच्या प्रस्तावानुसार पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मौजे सदुंबरे येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ला ३ हेक्टर जमीन विनामूल्य देण्यास मंजुरी देण्यात आली. येथे एनडीआरएफचा कायमस्वरूपी तळ उभारला जाणार असून आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण व बचाव कार्य अधिक प्रभावी होणार आहे.

४) श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या भाडेपट्ट्यावर मुद्रांक शुल्क माफ

अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, मोझरी यांना नागपूर येथील सुभाष रोडवरील जागेच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. सामाजिक, धार्मिक व जनकल्याणकारी कार्य करणाऱ्या संस्थेच्या विनंतीला मान्यता देण्यात आली.

५) लोक आयुक्त कार्यालयातील पदसंख्येत वाढ

सामान्य प्रशासन विभागाच्या प्रस्तावानुसार लोक आयुक्त कार्यालयाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देण्यात आली. यापूर्वी मंजूर असलेल्या ८७ पदांमध्ये वाढ करून एकूण १४३ पदे मंजूर करण्यात आली आहेत. महाराष्ट्र लोक आयुक्त अधिनियम २०२३ प्रभावीपणे राबविण्यासाठी ही वाढ करण्यात आली आहे.

राज्याच्या विकास, कृषी शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, प्रशासन आणि लोकसेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे निर्णय महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.

Previous Post

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

Next Post

प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांवर होणार धोरणात्मक निर्णय; मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर होणार – मंत्री मकरंद जाधव-पाटील

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
191
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांवर होणार धोरणात्मक निर्णय; मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर होणार – मंत्री मकरंद जाधव-पाटील

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In