• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाचे रत्नागिरीत पडसाद; २३ जुलैला सरकारविरोधात भव्य निषेध मोर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 22, 2026
in Blog
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | रत्नागिरी | प्रतिनिधी

रत्नागिरी : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ रत्नागिरीमध्ये गुरुवार, दि. २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ‘शिव-शाहू, फुले-आंबेडकर विचार मंच’ यांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

आयोजकांच्या माहितीनुसार, देशभरातील विद्यार्थी शिक्षणातील वाढत्या समस्या, भरती प्रक्रियेतील विलंब आणि विविध शैक्षणिक धोरणांविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करत होते. मात्र, आंदोलकांशी संवाद साधण्याऐवजी पोलिस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना लोकशाही आणि संविधानिक मूल्यांना धक्का देणारी असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

रत्नागिरीतील निषेध मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. तेथे विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाचा निषेध नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.

हा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने पार पडणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षणाचा अधिकार आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी हा लढा असल्याचे सांगत जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, पालक, सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अभिजित हेगशेट्ये यांनी मोर्चाची भूमिका स्पष्ट केली. तसेच या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Tags: Dhiraj Khanvilkar
Previous Post

श्री गुरु तेग बहादर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार

Next Post

दोंडाईचा येथे प्रथमच भगवान श्री जगन्नाथ महाप्रभूंची भव्य रथयात्रा उत्साहात संपन्न

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
81
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

दोंडाईचा येथे प्रथमच भगवान श्री जगन्नाथ महाप्रभूंची भव्य रथयात्रा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In