• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंपळसुटीत बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 22, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

ऊसतोड कामगारांच्या मुलीवर पहाटे गोठ्यात झोपेत असताना हल्ला; वन विभागाची युद्धपातळीवर शोधमोहीम

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | शिरूर | प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी परिसरात बुधवारी (दि. २२ जुलै) पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. भाग्यश्री संदीप वारे असे मृत मुलीचे नाव असून ती ऊसतोड कामगार दाम्पत्याची मुलगी होती. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री ही आई-वडिलांसोबत घराशेजारील गोठ्यात झोपली होती. पहाटे सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात घुसून तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक उपवनसंरक्षक राजहंस मॅडम तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वन विभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शासनाच्या नियमानुसार मृत मुलीच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

घटनेनंतर वन विभागाने बिबट्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली असून परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत. तसेच कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आले असून ड्रोनच्या माध्यमातूनही पाहणी सुरू आहे. रात्रगस्त वाढविण्यात आली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

वन विभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये, लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावे आणि बिबट्याचे दर्शन झाल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. वन विभागाचा हेल्पलाईन क्रमांक : १८०० ३०३३.

दरम्यान, या घटनेनंतर पिंपळसुटी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

Tags: Avinash Ghogare
Previous Post

काजू कलमे न मिळाल्याने दोडामार्गमध्ये उद्या शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन

Next Post

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे साताऱ्यात शुक्रवारी आयोजन

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
84
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
18
Next Post

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे साताऱ्यात शुक्रवारी आयोजन

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In