• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीरामपूरच्या कायदा-सुव्यवस्थेचा राज्यस्तरावर आढावा; अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांची भेट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर | प्रतिनिधी

RelatedPosts

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

तरुण व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येनंतर श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यभर चर्चेचा विषय ठरला असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहराला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) निखिल गुप्ता यांनी श्रीरामपूर येथे भेट देऊन स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत सुमारे दोन तास उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत शहरातील कायदा व सुव्यवस्था, संघटित गुन्हेगारी, अवैध व्यवसाय तसेच गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर उपस्थित होते.

आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता, तसेच सलग चार दिवस शहर बंद पाळण्यात आला. गुन्हेगारीविरोधात विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आंदोलन करत कठोर कारवाईची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर राज्य पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची श्रीरामपूर भेट आणि उच्चस्तरीय आढावा बैठक ही शहरातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Previous Post

भर पावसात युवकांचा तहसील कार्यालयावर लाँग मार्च; विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ निवेदन

Next Post

श्रीरामपूर तालुक्यावर दुहेरी संकट; पाऊस गायब, विहिरीही कोरड्या

Related Posts

ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
153
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

September 10, 2026
14
Next Post

श्रीरामपूर तालुक्यावर दुहेरी संकट; पाऊस गायब, विहिरीही कोरड्या

ताज्या बातम्या

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In