• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीरामपूर तालुक्यावर दुहेरी संकट; पाऊस गायब, विहिरीही कोरड्या

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर | प्रतिनिधी

RelatedPosts

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर तालुक्यात सुमारे ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने कोवळी पिके उन्हाच्या झळांमुळे करपू लागली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.

महागडे बियाणे, खते आणि मशागतीवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. सध्या जमिनीतील ओलावा कमी झाल्याने कापूस, सोयाबीन आणि मका या पिकांची वाढ खुंटली आहे. काही शेतकरी स्प्रिंकलर व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पिके वाचवण्याचा प्रयत्न करत असले, तरी विहिरी आणि बोअरवेलही कोरड्या पडू लागल्याने त्यांच्यासमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.

तालुका कृषी विभागाने यंदा ३६ हजार ६२२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे लक्ष्य निश्चित केले होते. मात्र आतापर्यंत केवळ २२ हजार ५१२ हेक्टर (सुमारे ७५ टक्के) क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक गणित खरीप हंगामावर अवलंबून असते. यंदा जूनपासूनच पावसाने अनियमित हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्यावर कशीबशी पेरणी पूर्ण केली. मात्र त्यानंतरच्या दीर्घ खंडामुळे उगवून आलेली पिके कोमेजू लागली आहेत.

काही ठिकाणी कोळपणी व खुरपणीची कामे सुरू असली तरी तालुक्यातील बहुतांश शिवार अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. लवकरच समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Previous Post

श्रीरामपूरच्या कायदा-सुव्यवस्थेचा राज्यस्तरावर आढावा; अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांची भेट

Next Post

पर्यावरण मंडळाच्या वतीने श्रीरामपूर एसटी आगारात वृक्षारोपण; ७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

Related Posts

ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
147
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

September 10, 2026
10
Next Post

पर्यावरण मंडळाच्या वतीने श्रीरामपूर एसटी आगारात वृक्षारोपण; ७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In