• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भर पावसात युवकांचा तहसील कार्यालयावर लाँग मार्च; विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

नांदगाव खंडेश्वर | प्रतिनिधी

शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या सुरक्षेची मागणी तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ व दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ भर पावसात शेकडो युवकांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर लाँग मार्च काढला.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

नगराध्यक्ष सौ. प्राप्ती मारोटकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे प्रकाश मारोटकर, काँग्रेसचे अमोल धवसे आणि एसएफआयचे राजगुरू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले. मोर्चानंतर तरुण युवक कृती समितीच्या वतीने तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

स्थानिक विश्रामगृहापासून सुरू झालेल्या मोर्चात सहभागी युवकांनी हातात तिरंगा तसेच महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन शांततेत मार्च काढला. तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर नायब तहसीलदार देशपांडे यांनी कार्यालयाबाहेर येऊन निवेदन स्वीकारले.

यावेळी विविध राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व शेकडो युवक उपस्थित होते.

यावेळी प्रकाश मारोटकर यांनी सांगितले की, पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असून, वर्षानुवर्षे परिश्रम करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात.

Tags: Maroti Kalelar
Previous Post

समाजकल्याण कार्यालयासमोरील कचराकुंडीचे हरितस्थळात रूपांतर; नागरिक, विद्यार्थी व महापालिकेचा आदर्श उपक्रम

Next Post

श्रीरामपूरच्या कायदा-सुव्यवस्थेचा राज्यस्तरावर आढावा; अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांची भेट

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
1
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
157
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
2
Next Post

श्रीरामपूरच्या कायदा-सुव्यवस्थेचा राज्यस्तरावर आढावा; अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांची भेट

ताज्या बातम्या

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In