मारे, प्रतिनिधी, प्रणय खैरे…. 🖊️…… सारथी महाराष्ट्राचा न्यूज.
मारेगाव तालुक्यात येत असलेल्या कुंभl सर्कल मधील ग्राम गदाजी बोरी, येथील विद्यार्थिनी शिक्षणाकरिता जवळच असलेल्या खैरी, तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ. इथे शिक्षणासाठी रोज जाणी येणे कठीण असून गदाजी बोरी येथील जवळपास 20 ते 25 मुली रोज पायदळ यात्रा करून आपले शिक्षण करत असल्याचे प्रत्यक्ष पाहणी केली असता आढळून आले आहे. अकरा वाजता शाळेच्या टायमावर हजर होणे नंतर सायंकाळी पाच वाजता शाळेला सुट्टी झाल्यावर पायदळ घरी येणे इतका मोठा त्रास असूनही या विद्यार्थ्यांच्या समस्या कडे शाळा समिती, व महामंडळ प्रशासन यांचे दुर्लक्ष होत आहे. गदाजी बोरी येथील विद्यार्थिनींनी स्वतः समोर येऊन हा प्रकार आपल्या शब्दातून वर दर्शविलाआहे, अगोदरच होणाऱ्या कर्मकांडाकडे लोकांचे लक्ष वेधले आहे तरीही या विद्यार्थिनींना पायदळ यात्रा करावी लागत आहे या मुलींना पायदळ येताना कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यास यास सर्वस्व प्रशासन जिम्मेदार राहील अशी स्थानिक नागरिकांनी मागणी बातमी मार्फत प्रशासनाकडे केली आहे.











