• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“सावित्री नदीतील गाळ उपसा प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करा; अन्यथा १५ ऑगस्ट रोजी महाड येथे आमरण उपोषण”

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 6, 2026
in महाराष्ट्र
0
“सावित्री नदीतील गाळ उपसा प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करा; अन्यथा १५ ऑगस्ट रोजी महाड येथे आमरण उपोषण”
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष श्रीकांत कांबळे यांनी आज दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रायगड जिल्हाधिकारी तसेच रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सावित्री नदीपात्रातील गाळ व वाळू उपसा कामामध्ये झालेल्या कथित अनियमितता, सार्वजनिक निधीचा वापर, अनधिकृत उत्खनन, अवैध वाहतूक, महसुलाचे संभाव्य नुकसान तसेच संपूर्ण कामाची प्रशासकीय, आर्थिक व तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

यावेळी संताजी पवार (श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष), अश्विनी ताई ठाकूर (रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्षा) आणि साईनाथ म्हात्रे (अलिबाग विधानसभा सरचिटणीस) हे प्रमुख उपस्थित होते. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष श्रीकांत कांबळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, महाड शहराला भविष्यातील पूरस्थितीपासून कायमस्वरूपी संरक्षण मिळावे या उद्देशाने सावित्री नदीपात्रातील गाळ उपसा करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च होऊनही प्रत्यक्षात पूरस्थितीबाबत नागरिकांमध्ये आजही तीच भीती कायम आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) मार्फत सर्वंकष चौकशी झालीच पाहिजे.
श्री. कांबळे पुढे म्हणाले की, सावित्री नदीपात्रातील गाळ काढल्यानंतर महाड शहराला पूर येणार नाही, असा निष्कर्ष कोणत्या तज्ज्ञ समितीने, कोणत्या वैज्ञानिक अभ्यासाच्या आधारे आणि कोणत्या तांत्रिक अहवालावर दिला, याची संपूर्ण माहिती जनतेसमोर आणली पाहिजे. संबंधित समितीचा अहवाल, शिफारशी, तांत्रिक अभ्यास, मोजमाप, निविदा प्रक्रिया, आर्थिक खर्च, वाहतूक नोंदी, परवानग्या, लेखापरीक्षण आणि संपूर्ण प्रशासकीय कागदपत्रे सार्वजनिक करण्यात यावीत. तसेच, गाळ उपसा प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार, नियमबाह्य उत्खनन, महसुलाचे नुकसान किंवा सार्वजनिक निधीचा गैरवापर झाला असल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदार किंवा जबाबदार व्यक्तींवर फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे पुरावे नष्ट होणार नाहीत यासाठी शासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात.


प्रसारमाध्यमांना दिलेल्या बाईटमधील महत्त्वाचे मुद्दे….
प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीहर्ष श्रीकांत कांबळे म्हणाले, “हा कोणत्याही व्यक्तीविरोधातील किंवा राजकीय हेतूने केलेला संघर्ष नाही. हा महाड शहराच्या भवितव्याचा, जनतेच्या सुरक्षिततेचा आणि सार्वजनिक पैशाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न आहे. महाडने २००५ आणि २०२१ मधील महापुराचा भीषण अनुभव घेतला आहे. भविष्यात अशा आपत्तीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासनाने केलेल्या कामाची वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक आहे.”
“जनतेच्या करातून खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचा प्रत्येक पैशाचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. गाळ उपसा कामाची सुरुवातीपासून आजपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एसआयटीमार्फत चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे.”
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने लढणारा पक्ष आहे. महाड शहराच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करू.”


“जर आमच्या निवेदनातील मागण्यांवर तातडीने आणि समाधानकारक कार्यवाही झाली नाही, तर शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील.”
शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने प्रशासनाला आवाहन करण्यात आले की, या प्रकरणात तातडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि महाड शहराला भविष्यातील पूरस्थितीपासून कायमस्वरूपी संरक्षण देण्यासाठी शास्त्रशुद्ध व दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात.

निवेदन देणारे :
श्रीहर्ष श्रीकांत कांबळे
रायगड जिल्हा सचिव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार

प्रमुख उपस्थित :
संताजी पवार – श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष
अश्विनी ताई ठाकूर – रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्षा
साईनाथ म्हात्रे – अलिबाग विधानसभा सरचिटणीस

– प्रसिद्धी विभाग
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, रायगड जिल्हा.

Tags: Kailasraje gharat
Previous Post

परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नंदकुमार डाखोरे यांचा आलेगाव येथे नागरी सत्कार!

Next Post

गारखिंडीच्या लेखकाची राष्ट्रीय पातळीवर झेप; ‘एक रोटी तीन चूल्हे’चा प्रकाशन सोहळा संपन्न.

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
गारखिंडीच्या लेखकाची राष्ट्रीय पातळीवर झेप; ‘एक रोटी तीन चूल्हे’चा प्रकाशन सोहळा संपन्न.

गारखिंडीच्या लेखकाची राष्ट्रीय पातळीवर झेप; ‘एक रोटी तीन चूल्हे’चा प्रकाशन सोहळा संपन्न.

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In