• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 8, 2026
in महाराष्ट्र
0
बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

चिखलगाव, दि.(८): (आळंदी प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन व संरक्षण तसेच हरित चळवळीला गती देणे आणि पवित्र श्री क्षेत्र भीमाशंकर परिसराचे नैसर्गिक अध्यात्मिक , धार्मिक, आरोग्य विषयक सौंदर्य टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने दि.(७) जुलै , वार ( शुक्र) २०२६ रोजी, चिखलगाव येथे एका विशेष पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भीमाशंकर रोप– वे व रस्ताकृती समिती आणि शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, चिखलगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “बेल वृक्ष वाटप आणि वृक्षारोपण ”कार्यक्रम अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला. शिवभक्त कमलेश शारदा प्रसाद मिश्रा यांच्या विशेष सहकार्याने उपक्रमाचे आयोजन शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चिखलगाव, खेड येथे झाले. या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. उपक्रमाचे संयोजक किसनराव गोपाळे ,लक्ष्मणराव मुके, शोभाताई गोपाळे, बाळासाहेब गोपाळे, कैलासराव गोपाळे ,संजय साळुंखे,दत्ता देशमुख,दत्ता कुंभार, उल्हास मुके यांनी परिश्रमपूर्वक कार्यक्रमाचे नियोजन केले. या प्रसंगी दीपक बच्चे पाटील, ॲड.दत्तात्रय घोंगे, डॉ.किशोर घुमटकर, हरिष देखणे आदी मान्यवर उपस्थित होते.रोप–वे आणि रस्ताकृती समितीचा पुढाकार ही महत्वपूर्ण ठरला.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

भीमाशंकर रोप–वे प्रकल्पाच्या आणि पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच या भागातील पर्यावरणाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे, हा संदेश समितीच्या वतीने देण्यात आला .कार्यक्रम स्थळी उपस्थिताना बेल वृक्षांचे मानवी जीवनात असणारे अध्यात्मिक, धार्मिक, आरोग्य, पर्यावरण विषयक महत्व मार्गदर्शनातून सांगितले. भगवान शिव शंकरांना अत्यंत प्रिय असलेल्या पवित्र बेल वृक्षांची (बिल्वपत्र )लागवड करून भीमाशंकर परिसरातील अध्यात्मिक आणि पर्यावरणीय समतोल राखण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आणि व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. शासकीय माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात उत्साहाने भाग घेतला तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि समितीच्या सदस्यांनी चिखलगाव परिसरात अनेक ठिकाणी“ बेल वृक्षांची“ रोपे लावून त्यांच्या जतन, संवर्धन, संरक्षणाची जबाबदारी घेतली. “प्रतिवर्षी प्रत्येकी एक तरी वृक्ष लावू ,धरती मातेचे उत्तराई होऊ, प्रदूषणमुक्त विश्व करू “या संदेशासह उपस्थित विद्यार्थी ,नागरिकांनी मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यास संयोजकांनी आवाहन केले आहे. याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की,केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे जतन, संवर्धन व संरक्षण करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. आश्रम शाळेच्या शिक्षकांनी आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमामुळे चिखलगाव आणि भीमाशंकर परिसरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणा विषयी एक नवी जाणीव– जागृती निर्माण झाली असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. पर्यावरण संवर्धन आणि हरित चळवळीला प्रोत्साहन व गती देण्यासाठी या प्रेरणादायी उपक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

Tags: Shailaja Kulkarni
Previous Post

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

Next Post

साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न.

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न.

साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न.

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In