• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 22, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

‘दीड तास ट्रॅफिकमध्ये अडकलो’; गणेशोत्सवातील डीजे-डॉल्बीच्या वादावरही केले भाष्य

पुणे | प्रतिनिधी : गणेशोत्सवानिमित्त पुण्यात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी शहरातील वाहतूक कोंडीबाबत नाराजी व्यक्त केली. सोमवारी (दि. २१ सप्टेंबर) सायंकाळी सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मित्रमंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुण्यात येताना आपल्याला तब्बल दीड तास वाहतूक कोंडीत अडकावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

जितेंद्र यांनी सांगितले की, गेल्या सुमारे १५ वर्षांपासून आपण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पुण्यात येत आहोत. मात्र, यंदा पुण्यात येताना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदत केल्यामुळे पुढील प्रवास करणे शक्य झाले, असे त्यांनी सांगितले.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

‘जोपर्यंत शरीरात प्राण आहे, तोपर्यंत पुण्यात येत राहणार’

पुण्यातील गणेशोत्सवाशी असलेले आपले जुने नाते सांगताना जितेंद्र यांनी वाढते वय आणि त्यातून येणाऱ्या अडचणी असल्या तरी पुण्यातील गणेशोत्सवाचा उत्साह आणि गणपती बाप्पावरील श्रद्धा कायम असल्याचे सांगितले. या मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी भविष्यातही पुण्यात येत राहण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात मध्यवर्ती पुण्यात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने वाहतूक पोलिसांनी विविध मार्गांवर वाहतूक बदल, वाहनबंदी आणि पार्किंग निर्बंध लागू केले आहेत. लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता आणि टिळक रस्ता यांसह मध्यवर्ती भागातील प्रमुख मार्गांवर गर्दी नियंत्रणासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

डीजे-डॉल्बीच्या वादावरही भाष्य

गणेशोत्सवातील डीजे आणि डॉल्बीच्या आवाजाबाबत विचारलेल्या प्रश्नावर जितेंद्र यांनी सणाच्या काळात यावरून अनावश्यक वाद निर्माण करू नये, अशी भूमिका व्यक्त केली. गणेशोत्सव हा श्रद्धा आणि आनंदाचा उत्सव असून, उत्सवाचा आनंद घेताना वातावरणातील शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील वाढती गर्दी लक्षात घेता वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जितेंद्र यांच्या वाहतूक कोंडीवरील वक्तव्याची चर्चा पुण्यात होत आहे.

Previous Post

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

Next Post

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
0
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
0
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
2
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
2
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
5
Blog

कानडी, पाचमोरी व सुकोडा फाटा परिसरात विकासकामांचा धडाका

September 22, 2026
0
Next Post
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In