• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 7, 2026
in महाराष्ट्र
0
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

शहादा,दि.06(प्रतिनिधी)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ (मुले-मुली) स्पर्धेत मुलांच्या गटात जैनपूर (ता. शिरोळ) कृषी महाविद्यालयाने तर मुलींच्या गटात कोल्हापूर कृषी महाविद्यालयाने बाजी मारत अजिंक्यपद पटकावले. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथे या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या 13 जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांचे सुमारे 200 खेळाडू, मार्गदर्शक व व्यवस्थापक सहभागी झाले होते.महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश पाटील हे होते.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

कार्यक्रमाला शहादा उपविभागाचे पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी डॉ. अभिजीत नलावडे, कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे क्रीडा अधिकारी डॉ. रामचंद्र बोरसे आणि बुद्धिबळपटू शोभराज खोंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील म्हणाले, “जिद्द व चिकाटीच्या जोरावर कोणत्याही स्पर्धेत यश संपादन करता येते. बुद्धिबळ या खेळात योग्य वेळी अचूक निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. मुलांमध्ये जैनपूर आणि मुलींमध्ये कोल्हापूर संघ विजेता ठरल्याने कुस्तीसोबतच कोल्हापूर आता बुद्धिबळातही आघाडीवर असल्याचे खेळाडूंनी सिद्ध केले आहे.”पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, “आजच्या काळात क्रिकेटचा बोलबाला अधिक असताना आणि पारंपरिक खेळ मागे पडत असताना राज्यातील विविध भागांतून खेळाडू बुद्धिबळ स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले, ही कौतुकास्पद बाब आहे.” अध्यक्षीय भाषणात जगदीश पाटील यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करत पराभूत संघांना अधिक सराव करून आगामी स्पर्धेसाठी जोमाने तयारी करण्याचा सल्ला दिला.

स्पर्धेचा अंतिम निकाल असा:
मुलांचा गट:
प्रथम: कृषी महाविद्यालय जैनपूर (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर)
द्वितीय: कृषी महाविद्यालय कोल्हापूर
तृतीय: कृषी महाविद्यालय लोणी (ता. राहता)
मुलींचा गट:
प्रथम: कृषी महाविद्यालय कोल्हापूर
द्वितीय: कृषी महाविद्यालय पुणे व कृषी महाविद्यालय रेठरे (ता. कराड, जि. सातारा)
तृतीय: कृषी महाविद्यालय धुळे
या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रशेखर पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल यांनी मानले.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, संचालक मयूरभाई पाटील आणि प्राचार्य डॉ. पी. एल. पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. शोभराज खोंडे, क्रीडा संचालक प्रा. डॉ. अरविंद कांबळे, प्रा. डॉ. गोपाल गवई, प्रा. डॉ. महेश जगताप, प्रा. डॉ. आर. आर. सोनवणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. संदीप पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

Next Post

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In