कुपोषणमुक्तीसह ग्रामीण भागातील बालकांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा संकल्प
प्रतिनिधी : | दि. २१ सप्टेंबर २०२६
कोटमी : ग्रामपंचायत कोटमी अंतर्गत मौजा नवेगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्राचे लोकार्पण सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत कोटमीच्या सरपंच कु. सिंधू घिसू मोहंदा यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातील लहान मुलांना बालवयातच योग्य मार्गदर्शन, शिक्षणाची गोडी तसेच पोषणविषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि कुपोषणमुक्तीच्या उद्देशाला चालना मिळावी, या हेतूने नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामुळे नवेगावातील बालकांच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सर्वांगीण विकासाला अधिक बळ मिळणार आहे.
उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायत कोटमीचे शिपाई विलास मोहरेवार, रोजगार सेवक शिवाजी कुमरे, गाव पाटील झगडू मट्टामी, सोमजी कुमोटी, नवेगावच्या अंगणवाडी सेविका छाया सोमजी कुमोटी, मदतनीस ज्योती मट्टामी, एटावाही येथील अंगणवाडी सेविका कांता पठाण यांच्यासह नवेगावातील नागरिक, महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन अंगणवाडी केंद्रामुळे ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित व पोषक वातावरणात शिक्षण, मार्गदर्शन आणि पोषणविषयक सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच बालकांच्या आरोग्य व शैक्षणिक विकासाला योग्य दिशा मिळून त्यांच्य




