• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 22, 2026
in Blog
0
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
0
SHARES
32
VIEWS
Ad 1
Ad 1

ग्रामस्थांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; पावसाळ्यात दळणवळणाचा प्रश्न अधिक गंभीर

प्रतिनिधी : | २१ सप्टेंबर २०२६

एटापल्ली : कसनसूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मुसरामगुडा गावातील मुख्य गिट्टी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, या रस्त्याची तातडीने विशेष दुरुस्ती करून नवीन डांबरीकरण किंवा सिमेंट रस्ता करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

RelatedPosts

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

२१ सप्टेंबर रोजी सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभा मुसरामगुडा यांच्या वतीने एटापल्ली सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. मुसरामगुडा गावाला तालुक्याशी जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

रस्त्यावर खड्डेच खड्डे; अपघाताचा धोका

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मुसरामगुडा येथील मुख्य गिट्टी रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला असून, रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी अस्ताव्यस्त पसरली आहे. अनेक ठिकाणी गिट्टी निघून गेल्याने मोठमोठे खड्डे व खडबडीत भाग निर्माण झाले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. महिला, वृद्ध नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना या मार्गावरून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

शिक्षण, आरोग्य व बाजारपेठेसाठी हाच प्रमुख मार्ग

मुसरामगुडा हे कसनसूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गाव असून, दैनंदिन गरजा, शासकीय कामे, शिक्षण, आरोग्यसेवा तसेच बाजारपेठेसाठी ग्रामस्थांना याच मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. मात्र रस्त्याची बिकट अवस्था झाल्याने नागरिकांच्या दळणवळणावर त्याचा थेट परिणाम होत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.

तात्पुरती डागडुजी नको; कायमस्वरूपी उपाययोजना करा

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून विशेष दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. केवळ खडी टाकून तात्पुरती डागडुजी न करता नवीन डांबरीकरण किंवा सिमेंट रस्त्याचे दर्जेदार बांधकाम करण्यात यावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभेच्या निवेदनामुळे मुसरामगुडा येथील रस्त्याचा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आला आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग या मागणीची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून कोणती कार्यवाही करतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

Next Post

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

Related Posts

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!
Blog

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

November 6, 2026
42
सगळ्यांसाठी जगलेला माणूस…
Blog

सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

November 6, 2026
35
भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!
Blog

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

November 5, 2026
19
तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश
Blog

तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश

November 5, 2026
73
स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!
Blog

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

November 3, 2026
7
साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!
Blog

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

November 3, 2026
43
Next Post

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

ताज्या बातम्या

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 7, 2026
तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात

तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात

November 7, 2026
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!

November 7, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In