• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा शहरातील खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न सुटणार; महावितरण महिन्याभरात 10 नवीन डीपी बसवणार.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
शहादा शहरातील खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न सुटणार; महावितरण महिन्याभरात 10 नवीन डीपी बसवणार.
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

शहादा,दि.12(का.प्र.)
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले असून, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत ज्येष्ठ नेते डॉ.कांतीलाल टाटिया यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाची नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तात्पुरत्या अडचणी दूर करण्यासोबतच भविष्यात असे प्रश्न पुन्हा उद्भवू नयेत यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

पहिल्या बैठकीत शहरातील एकूण ट्रान्सफॉर्मर (डीपी), ओव्हरलोड असणारे भाग, वारंवार तक्रारी येणारे परिसर आणि जनतेच्या प्रत्यक्ष अडचणींचा आढावा घेण्यात आला. यानंतर दि. 11 ऑगस्ट रोजी झालेल्या दुसऱ्या बैठकीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महत्त्वाचे तांत्रिक निर्णय घेण्यात आले.यांत लिंक लाईन व स्विच बसवणे-विकास फीडरला तातडीने लिंक लाईन जोडणे, 33 केव्ही फीडरचे विभक्तीकरण करणे आणि व्हर्टिकल डीओ इन्स्टॉल करण्याचा निर्णय झाला आहे.याशिवाय 10 महत्त्वाच्या ठिकाणी 13 आणि 14 ऑगस्ट रोजी ए. बी. स्विच बसवले जातील.11 केव्ही विकास फीडर: शिव प्लाझा, पद्मावती लॉन्स,11 केव्ही साईबाबा फीडर: श्रेयांस हॉस्पिटलजवळ, गणेश नगर, महागणेश, मोदी नगर,11 केव्ही मलोनी फीडर: डोंगरगाव रोड, गौरीनंदन, मिशन बंगला येथे बसविण्यात येणार आहेत.शहरातील रेस्ट हाऊस, वृंदावन नगर, मिशन बंगला, सौभाग्य मंगल कार्यालय, अमन कॉलनी, सदाशिव नगर, सुवर्ण नगर, विकास फीडर, मांगूशेठ नगर, गौरीनंदन, कुलकर्णी हॉस्पिटल, वेद कन्स्ट्रक्शन, द्वारका नगर, हरिओम नगर, स्वामीनारायण मंदिर, मोतीलाल गॅरेज, गोशिया नगर आणि कुबेर नगर अशा 19 ठिकाणी डीपींवर प्रचंड ताण असल्याचे निदर्शनास आले आहे.

नागरिकांच्या तक्रारी आणि ओव्हरलोड डीपींची माहिती तपासून पुढील महिन्याभरात 10 ठिकाणी नवीन अतिरिक्त डीपी बसवण्याची कार्यवाही केली जाईल. यामध्ये विकास हायस्कूल, सौभाग्य मंगल कार्यालय, डॉ. कुलकर्णी हॉस्पिटल, स्वामीनारायण मंदिर, द्वारकाधीश नगर, नितीन नगर, कुबेर नगर, सदाशिव नगर, गौरीनंदन आणि मिशन बंगला या परिसरांचा समावेश आहे. तसेच डॉ. बी. डी. पाटील यांच्या हॉस्पिटलला वेगळ्या लाईनने जोडण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.शहादेकरांना भविष्यात अखंडित वीज मिळण्यासाठी दोन महत्त्वाच्या 33 केव्ही उपकेंद्रांचे काम हाती घेण्यात आले आहे.यांत 33 केव्ही सेंटर (मनरद) याचे मक्तेदार निश्चित झाले असून जुन्या 33 केव्ही सेंटरजवळील जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.33 केव्ही सेंटर (मोहिदा) या उपकेंद्राचे काम वेगाने सुरू असून ते फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.ही दोन्ही उपकेंद्र पूर्ण झाल्यानंतर शहादा शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या विजेची समस्या पूर्णपणे निकाली निघेल.
महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. प्रसाद आणि उपअभियंता श्री. पुष्पेन्द्र पाडवी यांनी या समस्येची गंभीर दखल घेत अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांनी प्रस्तावित केलेल्या उपाययोजनांमुळे शहादावासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठरलेली आणि राहिलेली कामे वेळेत पूर्ण झाल्यास महावितरणचे हे अधिकारी निश्चितच शहादेकरांच्या अभिनंदनास पात्र ठरणार आहेत अशी माहिती डॉ.कांतीलाल टाटिया यांनी दिली आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या रेशन धान्याचा पुरवठा करण्यात यावा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे प्रा. मकरंद पाटील यांची मागणी.

Next Post

डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न.

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न.

डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न.

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In