उदगीर / प्रतिनिधी
शंकर उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राध्यापिका येथील रहिवासी आणि गेल्या १८ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी शंकर उच्च माध्यमिक आश्रमशाळा च्या प्राध्यापिका वर्षा गंगाधर बिरादार-मरगणे यांना बुधवार दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वा.ओम मंगल कार्यालय बार्शी-तुळजापूर रोड, उपळे (दुमाला) ता. बार्शी जि. सोलापूर येथे अतिउत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट प्राध्यापिका पुरस्काराचे वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश देठे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार वितरण जिव्हाळा प्रतिष्ठान, स्वामिनी फाऊंडेशन, ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यासाठी – २०२६’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत एफ.आर.शेख तहसीलदार, तहसील कार्यालय बार्शी, ॲड. राहुल तुळशीदास झालटे, अध्यक्ष वकिल बार असोसिएशन संघ, बार्शी, मुस्ताक मिस्त्री पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, ग्राहक समिती, उमाकांत ढावारे, तालुकाध्यक्ष, जिव्हाळा प्रतिष्ठान, बार्शी, प्रा. इंद्रजीत पाटील, प्रसिध्द लेखक, साहित्यीक, अमुल कादबाने पोलीस निरीक्षक, वैराग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, निलेश आठवले, पुरवठा निरीक्षक अधिकारी, बार्शी, बालासाहेब शिंदे मराठवाडा अध्यक्ष, ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य, स्वप्निल बुरगुटे, तालुका उपाध्यक्ष, जिव्हाळा प्रतिष्ठान, बार्शी, तात्यासाहेब रोडे, प्रदेश युवकाध्यक्ष, ग्रा.स. महा.राज्य, यास्मिन शेख, सरकारी कामगार अधिकारी, बार्शी, तानाजी गुंड, संस्थापक अध्यक्ष ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य, संतोष कोल्हाळ, सोलापूर जिल्हाध्यक्ष, ग्राहक समिती, प्रा.राजेश पुजारी, सामाजिक कार्यकर्ते, उपळे (दु.), शिवाजी दांगट, धाराशिव जिल्हाध्यक्ष, ग्राहक समिती, सतिशकुमार रामराव बुरगुटे (सरकार), संस्थापक-अध्यक्ष, जिव्हाळा प्रतिष्ठान व स्वामिनी फाऊंडेशन, रामेश्वर बुरगुटे, उपसरपंच, उपळे(दु.), लखन भालेराव, तात्यासाहेब भालेराव, अमोल भालेराव, किशोर बुरगुटे, दादा खांडेकर, विशाल बुरगुटे, दत्ता कसबे, मन्सुर अत्तार, मेसा भालेराव, याकुब आवटे, नागनाथ पवार, रामेश्वर जगदाळे, महादेव चव्हाण, जनक कुरुंद, महादेव भिसे, आण्णा वाघमारे, मसा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वर्षा बिरादार यांचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, शंकर माध्यमिक आश्रम महाविद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, तसेच शाळेतील मुख्याध्यापक यांच्या वतीने शुभेच्छा देत अभिनंदन व कौतुक केले आहे.











