स्वरा शेळके राज्यात 14 वी
श्रीगोंदा : प्रतिनिधी
श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाने सातवी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयातील एकूण 75 विद्यार्थीनी परीक्षेस प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी 56 विद्यार्थीनी पात्र ठरल्या असून 17 विद्यार्थीनीनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्तीधारक ठरल्या आहेत. विद्यालयाचा शेकडा निकाल 75.68 टक्के लागला आहे.
या यशात विद्यालयाची गुणवंत विद्यार्थीनी शेळके स्वरा विलास हिने 276 गुण मिळवून राज्यात 14 वा क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीने विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
विद्यालयातील शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थीनींमध्ये शेळके स्वरा विलास (276), खामकर समर्था सुनील (256), भुजबळ भूमी दिनकर (254), म्हस्के स्वराली हंबीर (252), शिंदे अंशुला नितीन (252), वाळूंज ईश्वरी किशोरचंद्र (250), फडताळे स्वराली गणेश (248), बोनगे स्नेहा शंकर (240), सुद्रिक सिद्धी मच्छिंद्र (230), सुद्रिक वेदिका पांडुरंग (228), मचे श्रवंती तुषार (224), मोटे अमृता सुहास (222), शेंडगे श्रावणी सुधीर (222), कुताळ सई अरुण (218), बांदल सायली शिवाजी (216), तळेकर सई महादेव (216) आणि हिंगणे वैष्णवी सचिन (214) यांचा समावेश आहे.
विद्यार्थिनींच्या या यशामागे विभागप्रमुख सचिन गारुडकर (बुद्धिमत्ता), कुंदन खामकर (गणित), जयश्री कुदांडे (मराठी) आणि विठ्ठल होले (इंग्रजी) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उज्ज्वल यशाबद्दल मुख्याध्यापिका वर्षा भोईटे ,पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे,गुरुकुलप्रमुख किरण शिंदे यांनी सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थीनी, मार्गदर्शक शिक्षक तसेच पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
विद्यालयाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, विभागीय अधिकारी, सहा. विभागीय अधिकारी व सर्व सदस्य, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, माता पालक व शिक्षक पालक संघ तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले आहे.
विद्यार्थिनींची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांच्या त्रिवेणी संगमातून विद्यालयाने हे घवघवीत यश संपादन केले आहे. या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.










