• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चाळीसगावात घरफोडीचा छडा; संशयित आरोपी जेरबंद, ४० हजारांची रोकड हस्तगत

Pratik Tidke by Pratik Tidke
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
चाळीसगावात घरफोडीचा छडा; संशयित आरोपी जेरबंद, ४० हजारांची रोकड हस्तगत
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

विभागीय प्रतिनिधी
महेशप्रसाद दिक्षित
चाळीसगाव शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना शहर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून ४० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्याला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.
३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेच्या सुमारास घराच्या मागील बाजूच्या भिंतीवरील पत्र्याचा काही भाग काढून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेली ८० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची तक्रार ३ ऑगस्ट रोजी पोलिसांत दाखल करण्यात आली होती.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

तक्रार प्राप्त होताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. संशयिताचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित नदिमशहा लियाकतशहा हा चाळीसगाव शहरातील घाट रोड व विष्णू पार्क परिसरात फिरत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपये रोख आढळून आले. चौकशीत त्याने घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेली रोकड चोरीच्या रकमेपैकी असल्याचेही तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी रोकड जप्त करून आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. चोरीतील उर्वरित रक्कम तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, कॉन्स्टेबल महेश पाटील, सागर पाटील आणि भूषण शेळार यांचा सहभाग होता.
पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास वेगाने पुढे सरकला असून, नागरिकांमध्येही पोलिसांच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

Tags: Maheshprasad Dikshit
Previous Post

🚨 नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली तब्बल ५९१ कोटींची बनावट वर्क ऑर्डर; ३ कोटींची फसवणूक, जामनेरमधून दोघे अटकेत

Next Post

दोन वर्षांपासून रखडलेला पुनखेडा-पाटोंडी रस्ता; ग्रामस्थांचा संताप अनावर…!

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
दोन वर्षांपासून रखडलेला पुनखेडा-पाटोंडी रस्ता; ग्रामस्थांचा संताप अनावर…!

दोन वर्षांपासून रखडलेला पुनखेडा-पाटोंडी रस्ता; ग्रामस्थांचा संताप अनावर…!

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In