जळकोट | प्रतिनिधी
जळकोट येथील पंचायत समिती कार्यालयात आज Hostar Animal Company च्या वतीने पशुवैद्यकीय क्षेत्रातील आजार व त्यावरील उपचारपद्धती याबाबत विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या सेमिनारला पशुवैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी तसेच खासगी पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
जळकोट येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासह वाजरवाडा, कुनकी, आतनूर आणि घोणसी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कार्यरत शासकीय कर्मचारी तसेच परिसरातील खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सेमिनारमध्ये जनावरांना होणारे विविध आजार, त्यांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, उपचारपद्धती तसेच पशुधनाच्या आरोग्याची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पशुपालकांना योग्य वेळी उपचार मिळावेत आणि जनावरांचे आरोग्य चांगले राहावे, या दृष्टीने पशुवैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत माहिती देण्यात आली.
Hostar Animal Company च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पशुवैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांना आजार आणि उपचारांबाबत नवीन माहिती मिळण्यास मदत झाली. सेमिनारला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयोजकांनी समाधान व्यक्त केले.









