• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास टाळाटाळ; १५ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

“बँक ऑफ बडोदा, मानवत शाखेला शेतकऱ्यांचे निवेदन; पीक कर्ज न मिळाल्यास दुधना नदीपात्रात जलसमाधी आंदोलनाचा इशारा”

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

दै.सूर्यवर्ता

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

मानवत तालुक्यातील इरळद येथील शेतकऱ्यांनी बँक ऑफ बडोदा, मानवत शाखेच्या व्यवस्थापकांना निवेदन देत नवीन पीक कर्ज मंजूर करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिनांक 30 जुलै 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या या निवेदनात, सततची नापिकी, दुष्काळ तसेच ओला दुष्काळ यामुळे यापूर्वी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड वेळेत करता आली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी बँक ऑफ बडोदा, मानवत शाखेकडून पीक कर्ज घेतले होते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जाची नियमित परतफेड करता आली नाही. त्यानंतर बँकेच्या सूचनेनुसार 2024 मध्ये OTS (वन टाईम सेटलमेंट) अंतर्गत कर्जाची रक्कम भरून कर्ज निकाली काढण्यात आले.
यानंतर नवीन पीक कर्जासाठी बँकेत अर्ज केला असता, पुढील पाच वर्षे पीक कर्ज मिळणार नसल्याचे सांगण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनातून केला आहे. कर्जाची पूर्ण परतफेड करूनही शासनाच्या कर्जमाफी योजनेत समावेश नसताना नवीन पीक कर्ज नाकारले जात असल्याने अन्याय होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी बँक व्यवस्थापनाला तातडीने नवीन पीक कर्ज मंजूर करण्याची मागणी केली असून, 15 दिवसांच्या आत पीक कर्ज मंजूर न झाल्यास 15 ऑगस्ट 2026 रोजी मौजे इरळद येथील दुधना नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास बँक प्रशासन व संबंधित यंत्रणा जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, परभणी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, परभणी तसेच पोलीस अधीक्षक, परभणी यांनाही देण्यात आल्या आहेत.
निवेदनावर स्वाक्षरी करणारे शेतकरी
विठ्ठल रामकिशन मुुळे (इरळद)
मुंजाभाऊ मारोतराव बारहाते
हनुमान मुंजाभाऊ बारहाते
इंदर आबासाहेब मुुळे
बालासाहेब रावसाहेब मुुळे
गजानन प्रभाकरराव बारहाते
रामराव रावसाहेब मुळे
ज्ञानोबा बालासाहेब बारहाते
महानंदा रामेश्वर बारहाते
उषा विठ्ठलराव मुळे
आबासाहेब रामराव मुळे

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

Next Post

शिवसेना उबाठा पदाधिकारी निवडी संदर्भात संपर्क प्रमुखांचा पाथरी,जिंतूर विधानसभा मतदार संघात दौरा.

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
शिवसेना उबाठा पदाधिकारी निवडी संदर्भात संपर्क प्रमुखांचा पाथरी,जिंतूर विधानसभा मतदार संघात दौरा.

शिवसेना उबाठा पदाधिकारी निवडी संदर्भात संपर्क प्रमुखांचा पाथरी,जिंतूर विधानसभा मतदार संघात दौरा.

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In