इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभिनव साहित्यिक उपक्रम; वर्गशिक्षक श्री. मयूर भोम्बे यांची संकल्पना
सालवा, ता. मौदा, जि. नागपूर | दि. ८ ऑगस्ट २०२६ :
ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सालवा येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने ‘निनाद साहित्य उपक्रम’ या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन तसेच पालक-शिक्षक सभेचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
या उपक्रमाची संकल्पना इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री. मयूर भोम्बे यांची असून, विद्यार्थ्यांच्या साहित्यिक व सर्जनशील गुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या वाचन-लेखन व अभिव्यक्ती कौशल्याला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. विजय राव काठाळकर, सचिव, श्री साई सेवा शिक्षण मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सदस्य श्री. गुंडेराव ठाकरे, मुख्याध्यापक श्री. राजेश मोटघरे, पर्यवेक्षक श्री. एस. आर. पेंडाम तसेच प्रमुख अतिथी श्री. दिलीप येवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘निनाद साहित्य उपक्रमा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील साहित्यिक, सर्जनशील व वक्तृत्वाचे गुण विकसित होण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांनी विविध साहित्यिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
यानंतर पालक-शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यातील समन्वय आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांनी शिक्षकांशी सातत्याने संवाद साधावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वर्गशिक्षक श्री. मयूर भोम्बे, शिक्षकवृंद, विद्यार्थी व शिक




