मारे, प्रतिनिधी, प्रणय खैरे. 🖊️……. सारथी महाराष्ट्राचा न्यूज……
.
स्थानिक मारेगाव शहरात प्रभाग क्रमांक 13 मध्ये राहत असलेल्या गृहिणी, आचल अभिजीत मांडवकर यांनी स्वतःच्या घरात दिनांक 6 दहा वाजता चे दरम्यान बाथरूम मध्ये स्कार्फच्या साह्याने स्वतःला गळफास लावून घेतल्याची माहिती समोर आली आहे, बराच वेळ पत्नी आली नाही म्हणून घरात असलेल्या पतीने बाथरूमच्या खिडकीतून बगले असता हा प्रकार लक्षात आला तेव्हाच पतीने बाथरूमचे द्वार तोडून ग्रामीण रुग्णालय मध्ये प्रथम उपचाराकरिता नेण्यात आले. नंतर त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले मृत्यूशी सतत पाच दिवस व्हेंटिलेटर वर लढा देऊन अखेर मंगळवार ला पाच सहा च्या दरम्यान त्यांचीजीवन यात्रासंपली यामुळे अकरा महिन्याची चिमुरडी पोरगी झाली या प्रकरणाचा अजूनही खुलासा झालेला नाही समोरील तपास सुरू असून सध्या मारेगाव शहरात खळबळ उडाली आहे सगळीकडे शोक व्यक्त केला जात आहे.










