मेहकर : रोहित शिंदे
तालुक्यातील जानेफळ येथे संत गजानन महाराजांची पालखी १५ तारखेला दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याचे काम जानेफळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले.
पालखी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने भाविक व नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने पालखी सोहळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. काँक्रीटच्या सहाय्याने खड्डे बुजविण्यात येत असून, पालखी मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या रस्ता दुरुस्तीच्या कामाचे वेळी उपस्थित माजी पंचायत समिती सदस्य गजानन वडणकर, उपसरपंच विजय कृपाळ, तसेच ग्रा.प. सदस्य शिवसेना शहर प्रमूख मंटू राजूरकर,ग्रा.प.सदस्यपती संजू सुरजुसे होते . संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.











