महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, धुळे, शासकीय कृषी महाविद्यालय, धुळे, पशुसंवर्धन विभाग, धुळे तसेच लुपिन फाउंडेशन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने फुले समृद्ध ग्राम, सांजोरी येथे पशुधन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास डॉ. राहुल देसले, सहयोगी अधिष्ठाता, शासकीय कृषी महाविद्यालय, धुळे, डॉ. गिरीश पाटील, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, धुळे, , डॉ. दिनेश नांद्रे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, धुळे, तसेच श्री. सुनील सैंदाणे, लुपिन फाउंडेशन, धुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. धनराज चौधरी, डॉ. पंकज पाटील, डॉ. आतिश पाटील, श्री. रोहित कडू व श्री. विनोद मासुळे, प्रगतशील पशुपालक आदी उपस्थित होते. शिबिरामध्ये डॉ. रवींद्र गाडे, पशु विकास अधिकारी, मोराणे प्र., डॉ. रमण गावित, सहायक पशुविकास अधिकारी, डॉ. विलास गुंजाळ व डॉ. मुकेश माळी यांनी पशुधनाची आरोग्य तपासणी करून पशुपालकांना आवश्यक मार्गदर्शन केले.
शिबिरादरम्यान पशुधनासाठी आरोग्य तपासणी, लसीकरण, जंतनाशक उपचार, वंध्यत्व निवारण, गोचीड निर्मूलन, कृत्रिम रेतन आदी सेवा देण्यात आल्या. तसेच पशुपालकांना खनिज मिश्रणाचे वाटप करण्यात आले. पशुधनाचे आरोग्य, संतुलित आहार, नियमित लसीकरण, वेळेवर जंतनाशन व प्रजनन व्यवस्थापन, विविध शासकीय योजना, किसान क्रेडीट कार्ड याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धनराज चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रमण गावित यांनी केले. या उपक्रमामुळे सांजोरी गावातील पशुपालकांना पशुधनाच्या आरोग्य व उत्पादनक्षमतेशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या असून, पशुधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास निश्चितच मदत होणार आहे. कार्यक्रमासाठी कृषि विज्ञान केंद्र, येथील अधिकारी कर्मचारी, पशुसंवर्धन विभाग, धुळे अधिकारी कर्मचारी, लुपिन अधिकारी कर्मचारी व सांजोरी गावाचे ग्रामस्त यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.











