आढेगाव : आय चॅम्प अबॅकसच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धा परीक्षेत विरकर कोचिंग क्लासेस, आढेगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत दीप्ती सुरज चव्हाण, अदिती माने, आरुष माने, सोहम पाटील, शिवम पाटील, पुरुषोत्तम नागरे आणि प्रतीक माने या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विरकर कोचिंग क्लासेसच्या संचालिका प्रो. प्रा. सौ. वर्षा नागेश विरकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अबॅकस स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रता, मानसिक गणित, स्मरणशक्ती, आत्मविश्वास आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळते. जागतिक स्तरावरील अबॅकस स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी अशा स्पर्धांचा मोठा फायदा होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विरकर कोचिंग क्लासेस, आढेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश आढेगावच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.










