टेंभुर्णी : संत निरंकारी मंडळ (रजि.), दिल्ली, शाखा टेंभुर्णी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता संत निरंकारी सत्संग भवन, करमाळा चौकाजवळ, सुली रोड, टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर येथे होणार आहे.
“एक तुही निरंकार” या संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचा उद्देश गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देणे हा आहे. रक्तदान हे जीवनदान असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन संत निरंकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन प. आ. इंद्रपालसिंग नागपाल जी, प. आ. बाळासाहेब पवार जी, प. आ. चाँदभाई तांबोळी जी आणि प. आ. गणपत (बापू) जी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कार्यक्रमास विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिकांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
रक्तदान शिबिरासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून “रक्तदान—जीवनदान” या सामाजिक उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थळ : संत निरंकारी सत्संग भवन, करमाळा चौकाजवळ, सुली रोड, टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर.











