• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महिलांच्या हक्कांसाठी मनसे महिला सेनेचा पुढाकार; प्रशासनाकडे दोन प्रमुख मागण्या, आयुक्तांना दिले निवेदन..

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in Blog
0
महिलांच्या हक्कांसाठी मनसे महिला सेनेचा पुढाकार; प्रशासनाकडे दोन प्रमुख मागण्या, आयुक्तांना दिले निवेदन..
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

पनवेल|प्रतिनिधी|श्रीनाथ(गणेश) लाड|: महिलांच्या सार्वजनिक सुविधा, सुरक्षितता आणि महिला उद्योजकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसे पनवेल महानगर महिला सेनेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. मनसे पनवेल महानगराध्यक्ष सौ. स्वरूपा संजय सुर्वे यांच्या पुढाकाराने पनवेल महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन महिलांच्या विविध प्रश्नांबाबत दोन महत्त्वाची निवेदने सादर करण्यात आली.

RelatedPosts

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा, बसस्थानके तसेच महिलांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या परिसरांमध्ये स्वच्छ, सुरक्षित आणि पुरेशा संख्येने सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी पहिल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. महिलांच्या दैनंदिन गरजा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा अत्यावश्यक असल्याचे मनसे महिला सेनेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

दुसऱ्या निवेदनाद्वारे शासनाच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या फूड ट्रक व्यवसायाबाबत महत्त्वाची मागणी करण्यात आली. महिला उद्योजिकांच्या फूड ट्रकवर वारंवार कारवाई करून त्यांना त्रास देण्याऐवजी महानगरपालिकेने त्यांच्या व्यवसायासाठी निश्चित आणि अधिकृत जागा उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका मनसे महिला सेनेने मांडली.

या महिला आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून फूड ट्रकचे हप्ते भरत आहेत. त्यामुळे वारंवार कारवाई करण्याऐवजी त्यांना व्यवसायासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणे, हा महिला स्वावलंबनाला प्रोत्साहन देणारा सकारात्मक मार्ग असल्याचे महिला सेनेने स्पष्ट केले.

तसेच स्थानिक महिलांच्या फूड ट्रकवर कारवाई केली जात असताना इतर राज्यांतील व्यक्तींच्या फूड ट्रकवरही समान नियमांनुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने सर्व व्यावसायिकांसाठी समान नियम आणि समान निकष लागू करावेत, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

यावेळी पनवेल महानगराध्यक्ष श्री. योगेश चिले, पनवेल महानगर सचिव श्री. पराग बाजार, पनवेल महानगर सचिव महिला अॅड. अशिता पाटील, पनवेल उपशहर अध्यक्ष सौ. साक्षी दळवी, श्री. रोहन पाटील, कळंबोली उपशहर अध्यक्ष श्री. राहुल चव्हाण, नवीन पनवेल उपशहर अध्यक्ष श्री. संदीप जाधव, खारघर उपशहर अध्यक्ष श्री. लक्ष्मण वानखेडे तसेच नवीन पनवेल विभाग अध्यक्ष श्री. अंकुर पाटील उपस्थित होते.

महिलांच्या मूलभूत सुविधा, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबनासाठी महिला सेनेचा संघर्ष यापुढेही सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

टेंभुर्णी येथे संत निरंकारी मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजन…

Next Post

खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !

Related Posts

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात
Blog

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026
1
Blog

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026
6
Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
23
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
17
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
4
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
1
Next Post
खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !

खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In