• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकरण कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in महाराष्ट्र
0
सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकरण कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

​ऐतिहासिक वारशाचे जतन करत अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा विस्तार
​६०० कोटी रुपयांहून अधिक निधीतून विविध विकासकामे पूर्ण
​कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी):
पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक शासकीय रुग्णालय असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर), कोल्हापूर येथील विविध नूतनीकरण व आधुनिकीकरण कामांचे भव्य लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून करण्यात आले.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

​रुग्णालयाच्या ऐतिहासिक वारसास्थळाचे (हेरिटेज) जतन करत रुग्णांना उच्च दर्जाच्या व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ६०० कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून रुग्णालयाचा कायापालट करण्यात आला आहे.
​कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
​मान्यवरांचे स्वागत: कार्यक्रमाच्या प्रारंभी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थितांचे स्वागत केले.
​लघुपट प्रदर्शन: सीपीआर रुग्णालयाचा ऐतिहासिक प्रवास आणि नूतनीकरण कामांवर आधारित एका विशेष लघुपटाचे प्रदर्शन याप्रसंगी करण्यात आले.
​स्मृतीचिन्ह प्रदान: मान्यवरांना सीपीआर रुग्णालयाची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

​लोकार्पित झालेल्या प्रमुख अत्याधुनिक सुविधा:
​भव्य मुख्य प्रवेशद्वार कमान
​मॉड्युलर बर्न आयसीयू आणि मॉड्युलर जनरल आयसीयू
​अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर व एम.आर.आय. (MRI) विभाग
​रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अद्ययावत निवारा शेड
​ट्रॉमा केअर सेंटर आणि अत्याधुनिक निदान व उपचार सुविधा
​परिसर विकास, नवीन रस्ते, विद्युत व्यवस्था, इमारतींची दुरुस्ती व फर्निचर
​या नवीन सुविधांमुळे कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांना अधिक सक्षम, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शासकीय आरोग्य सेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

​प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सार्वजनिक आरोग्य व पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सर्वश्री अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राहुल आवाडे, अशोकराव माने, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महापौर रूपाराणी निकम, प्रधान सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, आणि सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

पंडित दीनदयाळ विद्यालय मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा-

Next Post

विद्यामंदिर शिवडाव येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post

विद्यामंदिर शिवडाव येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In