• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिंचणीच्या मुख्य रस्त्यासाठी आमरण उपोषण; गावकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in महाराष्ट्र
0
चिंचणीच्या मुख्य रस्त्यासाठी आमरण उपोषण; गावकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा
0
SHARES
496
VIEWS
Ad 1

रस्त्याच्या दुरवस्थेने ग्रामस्थ त्रस्त; १६ ऑगस्टला गाव बंदचा निर्णय

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

कडेगाव : चिंचणी गावातील मुख्य रस्ता प्रजिमा क्र. १८ (MDR-18) या रस्त्याची गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत चिंचणी (वांगी) समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

रस्त्याची दुरवस्था, खड्डे आणि पावसाळ्यात साचणारे पाणी यामुळे विद्यार्थी, शेतकरी, रुग्णवाहिका तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सदर रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्याबाबत १४ ऑगस्टपर्यंत अधिकृत लेखी पत्र देण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती. मात्र, अद्याप ठोस निर्णय न झाल्याने १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय, चिंचणी (वांगी) समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

या आंदोलनाला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळत असून, ग्रामसभेत रस्त्याच्या प्रश्नावर ठराव करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीनेही संबंधित प्रशासनाला पत्र देऊन उपोषणाला पाठिंबा देण्यात आला आहे.

दरम्यान, ग्रामस्थ व व्यापाऱ्यांच्या वतीने रविवार, १६ ऑगस्ट रोजी चिंचणी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील दुकाने तसेच आठवडी बाजार बंद ठेवून रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

रस्त्याच्या प्रश्नावर पीडब्ल्यूडीच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली असली तरी अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता चिंचणीकर आक्रमक झाले असून, रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Previous Post

डॉ. राममनोहर लोहिया नगर, महादेव मठ, गाडेकर वाडी, पंचशील नगर ओझर मिग ता. निफाड जि. नाशिक येथील बांधवानी आज शांततापूर्ण कॅन्डल रॅली काढण्यात आली.

Next Post

रिसोडमध्ये ‘हर घर तिरंगा’ रॅलीला प्रतिसाद

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post

रिसोडमध्ये 'हर घर तिरंगा' रॅलीला प्रतिसाद

ताज्या बातम्या

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In