• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

परसलगोंदी ग्रामसभेचा सवाल; सामूहिक वनहक्क क्षेत्रातील ४०० हेक्टर जमिनीबाबत चौकशी व कारवाईची मागणी

एटापल्ली, दि. २९ सप्टेंबर : तालुक्यातील ग्रामपंचायत उडेरा अंतर्गत येणाऱ्या परसलगोंदी गावातील कक्ष क्रमांक २७६ मधील सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रावर प्रकल्पास मंजुरी देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदर क्षेत्र पेसा कायदा, वनाधिकार अधिनियम तसेच सामूहिक वनहक्क (CFR) अंतर्गत येत असल्याचा दावा करत, प्रकल्पासंदर्भातील मंजुरीपूर्वी ग्रामसभेची पूर्वसंमती घेण्यात आली होती का, याची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

RelatedPosts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, परसलगोंदी ग्रामसभेला सामूहिक वनहक्क प्राप्त असून, या क्षेत्रातील जंगल, गौण वनउपज, शेती आणि पारंपरिक उपजीविकेच्या साधनांवर ग्रामस्थांचे हक्क आहेत. त्यामुळे संबंधित क्षेत्रात कोणताही प्रकल्प राबविताना ग्रामसभेच्या अधिकारांचा विचार होणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

प्रकल्पामुळे किती वनक्षेत्र प्रभावित होणार आहे, किती शेतकऱ्यांच्या जमिनीवर परिणाम होऊ शकतो आणि स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेवर त्याचा काय परिणाम होईल, याची माहिती ग्रामसभेसमोर मांडण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

२०२३ पासून काम सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

संबंधित प्रकल्पाच्या कामाला सन २०२३ पासून सुरुवात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, यासाठी तहसीलदार एटापल्ली, उपविभागीय अधिकारी एटापल्ली, अपर जिल्हाधिकारी अहेरी तसेच वनविभागाकडे निवेदने देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

‘उपजीविका आणि जंगलाच्या संरक्षणासाठी ग्रामसभेचा अधिकार अबाधित राहावा’

प्रकल्पामुळे जंगल, गौण वनउपज तसेच स्थानिक नागरिकांच्या पारंपरिक उपजीविकेच्या साधनांवर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. भविष्यात शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली असून, प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या कुटुंबांची माहिती आणि त्यांच्या हक्कांबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रकल्पाच्या कामाला विरोध करणाऱ्या काही ग्रामस्थांवर खोटे बयान देऊन गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

CFR क्षेत्रातील जमीन व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी

सामूहिक वनहक्क मान्यता मिळालेल्या क्षेत्रातील जमिनीच्या कथित खरेदी-विक्री व्यवहारांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सामूहिक वनहक्क क्षेत्रातील जमिनीच्या वापराबाबत किंवा व्यवहाराबाबत नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद २४४ व पाचवी अनुसूची, पेसा कायदा १९९६, वनाधिकार अधिनियम २००६ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या समता आणि नियामगिरी-वेदांत प्रकरणांतील निर्णयांचा संदर्भ देत अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेच्या अधिकारांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

कागदपत्रे व मंजुरी प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी

संबंधित प्रकल्पाची मंजुरी प्रक्रिया, उपलब्ध शासकीय कागदपत्रे, जमिनीचे स्वरूप, सामूहिक वनहक्काची नोंद आणि संबंधित जमीन व्यवहार यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ग्रामसभेच्या हक्कांचे संरक्षण करून जंगल, शेती आणि स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेचे साधन अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांना निवेदन

या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, एटापल्ली यांच्याकडेही निवेदन देण्यात आले आहे.

निवेदन देताना सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबन मंगु मट्टामी, सचिव रावजी देवू मट्टामी आणि कोषाध्यक्ष कविता नथू उसेंडी यांच्यासह विनोद पदा, रितेश जोई, चंदु गावडे, राकेश गावडे, सत्तू पदा, संजय पदा, कोमटी गावडे, चुकलू पदा, बंडू महा, कोको गावडे, अर्जुन पदा, साईनाथ आलामी, दलसु जोई, चैता पदा, रुपेश पदा, सीमा पदा, सरिता पदा, शीतल पदा, रीता महा, कविता पदा, रोशनी पदा, प्रिया दुर्वा, पूजा नरोटि, रीता मुळमा, आशा दुर्वा, रिंकू लेकामी, रीता गावडे, सीमा दुर्वा, संध्या गोटा, प्रियंका मटामी, निशा गुंडरू, नागेश मज्जी, विनोद लेकामी, नागेश पदा, राहुल मटामी, अनिल गावडे, रंजीत पदा, तरुण उसेंडी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांची संबंधित प्रशासनाकडून अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: Sugat Urade
Previous Post

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

Next Post

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

Related Posts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
4
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
3
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
16
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
1
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
4
मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
76
Next Post
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In