• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वंदे मातरम्’च्या जयघोषाने खारघर दुमदुमले; अभाविपच्या तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद!!

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
वंदे मातरम्’च्या जयघोषाने खारघर दुमदुमले; अभाविपच्या तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद!!
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

अभाविपच्या तिरंगा यात्रेत १७०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

खारघर | प्रतिनिधी |श्रीनाथ (गणेश) लाड|

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने खारघरमध्ये भव्य ११११ फूट तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून सुरू झालेली ही राष्ट्रभक्तीने भारलेली यात्रा उत्सव चौक येथे पोहोचली. या यात्रेत पनवेल व खारघर परिसरातील १७०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रध्वजाप्रतीचा सन्मान आणि देशभक्तीची भावना व्यक्त केली.

तिरंगा यात्रेमुळे संपूर्ण खारघर परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. हातात तिरंगा आणि मनात राष्ट्रप्रेमाची भावना घेऊन विद्यार्थी व नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व यांचा संदेश देणाऱ्या या यात्रेत युवा शक्तीचा उत्साह विशेष आकर्षण ठरला.

यात्रेचा समारोप उत्सव चौक येथे करण्यात आला. यावेळी अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री कु. पायल किनाके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. युवा पिढी ही देशाचे भविष्य असून, केवळ स्वप्ने पाहण्यापेक्षा ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ‘भारत माझ्यासाठी काय करणार?’ यापेक्षा ‘मी भारतासाठी काय करणार?’ हा विचार प्रत्येक युवकाने मनात रुजवावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे महापौर मा. नितीन पाटील, अभाविप जिल्हा संयोजक ऋतुजा भोर तसेच पनवेल महानगर मंत्री नील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभाविपच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्याबरोबरच देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी युवा पिढीला प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अभाविप करत असल्याचे त्यांनी नमूद केले. अभाविप ही विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा देणारी जगातील मोठी विद्यार्थी संघटना असल्याचेही त्यांनी सांगितले.

यात्रेच्या समारोपानंतर सहभागी झालेल्या विविध शाळा व महाविद्यालयांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी खारघरचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. ११११ फूट लांबीच्या तिरंग्याच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, एकता आणि देशसेवेचा संदेश देणारी ही तिरंगा यात्रा खारघरवासीयांच्या स्मरणात राहणारा राष्ट्रभक्तीचा भव्य सोहळा ठरली.

Previous Post

सुबोध संभाजी शिंदे याची निवड.

Next Post

नूतन विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम साजरा.

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
37
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
9
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
8
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
21
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
21
Next Post
नूतन विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम साजरा.

नूतन विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम साजरा.

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In